पुणे : जिल्ह्यात सर्वत्र महाविद्यालये आणि विद्यापीठांचे दरवाजे आजपासून खुली करण्यात येत आहेत. जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे आजपासून पुण्यामधील महाविद्यालये आणि विद्यापीठे सुरु करण्यात आले आहेत. महाविद्यालये आणि विद्यापीठात प्रवेशाकरिता विद्यार्थ्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे २ डोस घेणं बंधनकारक करण्यात आले आहे. जे विद्यार्थी पुण्याबाहेरुन येणार आहेत, त्यांना आरटीपीसीआर RTPCR अहवाल दाखवावा लागणार आहे.
पुणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळे देखील आजपासून सुरु होत आहेत. कोरोना Corona प्रादुर्भावाने देशासह इतर राज्यामध्ये लॉकडाऊन लावण्यात आला होता. यातच राज्यात शाळा, कॉलेज बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता कोरोनाचा प्रादुर्भाव मंदावल्याने राज्यात शाळांपाठोपाठ महाविद्यालये आणि विद्यापीठं परत सुरु करण्याचा निर्णय प्रशासनाने हाती घेतला आहे. राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात आजपासून कॉलेज आणि विद्यापीठ सुरु करण्यात येणार आहेत.
हे देखील पहा-
कॉलेजेस आणि विद्यापीठात प्रवेश करण्याकरिता विद्यार्थ्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे २ डोस घेणं अत्यंत गरजेचे असणार आहे. तसेच, जे विद्यार्थी पुणे जिल्ह्याच्या बाहेरून शिक्षणाकरिता पुण्यातील महाविद्यालयं आणि विद्यापीठांमध्ये येणार आहेत, त्यांना आरटीपीसीआर RTPCR रिपोर्ट दाखवावा लागणार आहे. अजित पवारांनी दिलेल्या माहितीनुसार, आता सोमवारपासून खासगी कार्यालयामध्ये १०० टक्के उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे, मात्र कोरोना नियमाचे पालन करणे देखील बंधनकारक असणार आहे. २२ ऑक्टोबरपर्यंत नाट्यगृह ५० टक्के क्षमतेने सुरु करण्याचा निर्णय घेऊ असे देखील अजित पवारांनी सांगितले होते. सोबतच पुणे शहरात हॉटेल आता ११ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.
दरम्यान, पुण्यात एकीकडे कॉलेज सुरु होत असतानाच दुसरीकडे पुणे जिल्ह्यातील पर्यटन स्थळे देखील आजपासून सुरु होणार आहे. काही दिवसांअगोदर उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुढच्या काही दिवसांत टप्प्या- टप्प्याने नाट्यगृह, पर्यटन स्थळं आणि विद्यापीठं सुरु करणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार, आजपासून पुण्यात महाविद्यालयं आणि पर्यटन स्थळे सुरु होणार आहेत.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.