Pune News Saam Tv News
मुंबई/पुणे

Pune News: पुण्यात हाणामारीचं सत्र सुरूच! कोल्ड्रिंगच्या गाड्यावर राडा, सीसीटीव्ही VIDEO व्हायरल

Cold drink seller attacked Pune: एका कोल्ड्रिंकच्या मालकाला गाडा लावण्यावरून टोळक्यांनी मारहाण केली आहे. ही धक्कादायक घटना पुण्यातील मोमिनपुरा येथे घडली आहे.

Bhagyashree Kamble

पुण्यात चाललंय तरी काय? असा प्रश्न आता प्रत्येकाला पडला आहे. स्वारगेट बलात्कार प्रकरण, खेडमध्ये जमांवाकडून मारहाण आणि आता गाडा लावण्यावरून मारहाणीचा प्रकार समोर आला आह एका कोल्ड्रिंकच्या मालकाला गाडा लावण्यावरून टोळक्यांनी मारहाण केली आहे. ही धक्कादायक घटना पुण्यातील मोमिनपुरा येथे घडली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

पुण्यातील मोमिनपुरा भागात एका कोल्ड्रिंग विक्रेत्याला टोळक्यांनी बेदम मारहाण केली आहे. कोल्ड्रिंगचा गाडा लावण्यावरून हा वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. मोमिनपुरा येथे एक व्यक्ती कोल्ड्रिंग विक्रेता आहे. त्या कोल्ड्रिंग विक्रेत्याला काही टोळक्यांनी मिळून मारहाण केली आहे.

कोल्ड्रिंग विक्रेत्याला मारहाण केल्यानंतर टोळक्यांनी त्याचा गाड्याचे देखील नुकसान केले आहे. या मारहाणीची घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेतली आणि प्रकरणाचा तपास केला. या मारहाणीचा व्हिडिओ देखील सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

पोलिसांनी तपासाला सुरूवात केली आहे. ही मारहाण कशामुळे करण्यात आली. यामागचं नेमकं कारण काय? याचा तपास पोलीस करीत आहेत. मारहाणीत जखमी झालेले कोल्ड्रिंग विक्रेत्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यातील तळ्यातील गणपतीच्या आरतीसाठी लोटला जनसागर

'तुम्हाला तात्या विंचू येऊन चावेल'; मोदीभक्त महेश कोठारेंना राऊतांचा टोला

किती गोंडस ती! रणवीर-दीपिका पादुकोणने पहिल्यांदा दाखवला मुलगी दुआचा चेहरा

Shocking : सुतळी बॉम्ब फोडताना घात झाला, एका चुकीमुळे तरुणाचा जीव गेला, ऐन दिवाळीत कुटुंबीयांच्या डोळ्यात पाणी

Raigad Politics: रायगडमधील राजकारणात मोठी उलथापालथ; राष्ट्रवादीचा नेता फुटला;भरत गोगावलेंनी खेळला मोठा डाव

SCROLL FOR NEXT