सुशांत सावंत -
मुंबई : प्रताप सरनाईक (Pratap Saranaik) यांची संपत्ती अंमलबजावणी संचलनालयाने (ED) जप्त केल्यानंतर त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधत आपल्यावरील कारवाई झाली त्याची नोटीस मला आली आहे. तसंच माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे आणि मी ईडीला सहकार्य करणार असल्याचं ते म्हणाले.
ते म्हणाले, हिरानंदानी येथे माझं स्वतःचं घर आहे जिथे मी राहतो आणि मिरारोड (MiraRoad) येथील प्रॉपर्टीवर कारवाई झाली आहे. माझ्या दोन मालमत्ता जप्त केल्याची नोटीस आली आहे. पुढील प्रक्रिया सुरू असून न्यायालयात आम्ही गेलो आहोत. शिवसेना प्रवक्ता असल्याने अर्णब आणि कंगना यांच्या विरोधात हक्क भंग टाकला होता. केंद्र विरुद्ध राज्य असा संघर्ष सुरू असून तो माझ्यापासून सुरु झाला असल्याचं सरनाईक म्हणाले.
ईडी ला सहकार्य करणार -
पहा व्हिडीओ -
ईडी ला सहकार्य करणार, ते बोलवतील तेव्हा जाणार, भारतीय न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास ३० दिवसाच्या आत मी अपील करणार आहे. न्यायालय जो निर्णय देईल त्याच्या अधीन राहून पुढची कारवाई करेन तसंच उद्धवजी (Uddhav Thackeray) कुटूंब प्रमुख ते मार्गदर्शन करतात. त्यांच्या कानावर गोष्टी घातल्या असल्याचंही ते म्हणाले. आमच्या पाठीशी मुख्यमंत्री आहेत असही ते म्हणाले.
हिरानंदानी स्वतःचे माझे राहते घर मीरा रोड येथीले 250 मीटरचा प्लॉट जप्त केला आहे. 11 कोटी 35 लाख किंमत असल्याचं सांगितलं. मी आधी विहंग ग्रुपचा चेअरमन आणि मग नगरसेवक झालो आहे राजकारणात येण्याच्या आधीपासून आपण व्यवसाय क्षेत्रात असल्याचंही त्यांनी स्पष्टीकरण यावेळी दिलं.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.