CM Uddhav Thackeray On Political Crisis In Maharashtra Saam Tv
मुंबई/पुणे

माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्रिपदी नको असेल तर काय करायचं?; उद्धव ठाकरेंची खदखद

CM Uddhav Thackeray On Political Crisis In Maharashtra : मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फेसबुकवर लाईव्ह येत जनतेशी संवाद साधला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: एकनाथ शिंदेनी शिवसेनेविरोधात आणि मविआ सरकारविरोधात बंड केल्यांनंतर महाविकास आघाडी सरकार कोसळण्याच्या उंबरठ्यावर आहे. एकीकडे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आपल्याला ४५ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा करत आहे तर दुसरीकडे शिवसेनेने (Shivsena) याबाबत आमदारांना जबरदस्तीने गुवाहाटीला डांबून ठेवण्यात आल्याचा आरोप केला आहे. या या सगळ्या प्रकरणात ठाकरे घराण्याचं राजकीय अस्तित्व संपुष्टात आलं आहे अशाही चर्चा सुरू आहेत. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी फेसबुकवर लाईव्ह येत जनतेशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींवर मोठं भाष्य केलं आहे. माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री म्हणून नको असेल तर काय म्हणावं असं ते म्हणाले. तसेच जर तुम्हाला मी मुख्यमंत्री म्हणून नको असेल तर मी आता मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतो असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. (CM Uddhav Thackeray On Political Crisis In Maharashtra)

हे देखील पाहा -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या फेसबुक लाईव्हवर म्हणाले की, बऱ्याच महिन्यांनी काय बोलणार आहे. बोलण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. कोविडचा विषय निघाल्यानंतर कोविडच्या काळात लढाई आपण लढलो. देशात पहिल्या पाचमध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची गणना केली गेली हे सगळं तुमच्या आशीर्वादामुळे. शिवसेना आणि हिंदुत्व घट्ट गुंफलेले आहेत. हिंदुत्वापासून शिवसेना कदापि दूर होणार नाही. म्हणूनच ८-१५ दिवसांपूर्वी आदित्य, एकनाथ शिंदे, आमदार, खासदार मंत्री अयोध्येला जाऊन आले. हिंदुत्वासाठी कुणी काय केलं हे सांगण्याची वेळ नाही असं मुख्यमंत्री म्हणाले.

हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुनही उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की, ही शिवसेना बाळासाहेबांची राहिली नाही. हे काही जे भासवतात असं मी काय केलंय? की बाळासाहेबांची शिवसेना दूर जात चालली आहे. २०१४ साली एकाकी लढलो होतो. मुद्दा विचार तोच असणार आहे. एकट्याच्या ताकदीवर प्रतिकूल परिस्थितीत ६३ आमदार निवडून आले. नंतर जे मंत्री झाले. ते आतापर्यंतची वाटचाल म्हणजे गेले अडीच वर्षे मी स्वतः मुख्यमत्री आहे. ते मंत्री आहेत ते पण बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

मुख्यमंत्री पदाबाबत उद्धव ठाकरे म्हणाले की, आजपर्यंत सगळ्यांनी साभाळून घेतलं आहे. दुःख कशाचं झालंय. दोन्ही पक्ष स्वातंत्र्य आहेत. आज सकाळी कमलनाथ यांनी फोन केला. शरद पवार यांनी फोन केला होता. त्यांनी भरवसा ठेवल्यानंतर माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्रीपदी नको असेल तर काय करायचं असा भावनिक सवाल उद्धव ठाकरेंनी केला आहे. तसेच त्यांनी आवाहन केलं की, समोर येऊन सांगायचं की, उद्धवजी तुम्ही कारभार करण्यास लायक नाहीत. एकाही आमदारांनं समोर येऊन सांगितले तर मी आता मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यास मी तयार आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: राज्यात शंभर टक्के पीक पाहणी होणार, सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

Mhada Home: म्हाडाचे घर असणाऱ्यांसाठी मोठी बातमी! सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत | VIDEO

ST Bus : पुणे-मुंबई प्रवास महागला, एसटीच्या तिकिटात वाढ, पाहा कोणत्या शहराला जायला किती तिकिट? |VIDEO

Kendra Yog 2025: उद्या म्हणजेच दसऱ्याला 'या' राशींना मिळणार नशीबाची साथ; गुरु-बुध बनवणार पॉवरफुल योग

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींमुळे ३६१ आमदारांचा निधी रखडला; सरकारी तिजोरीवर ताण; VIDEO

SCROLL FOR NEXT