मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना तब्बल २२ दिवसांनी रुग्णालयातून डिस्चार्ज (Discharge) मिळाला आहे. मानेचे स्नायू आणि पाठीच्या मणक्याच्या त्रासामुळे ते १० नोव्हेंम्बरला रिलायन्स रुग्णालयात दाखल झाले होते.
हे देखील पहा -
त्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रियाही (operation) करण्यात आली होती. तेव्हापासून ते रुग्णालयातच होते. अखेर आज सकाळी १०:४५ च्या सुमारास त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे. यावेळी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी स्वतः गाडी चालवली. सध्या मुख्यमंत्री वर्षा बंगल्यावर (varsha bungalow) दाखल झाले आहेत.
दरम्यान रुग्णालयात दाखल होण्यापुर्वी मुख्यमंत्र्यांनी एक निवेदन जाहीर केलं होतं त्यात ते म्हणाले होते की, "गेल्या सुमारे दोन वर्षांपासून आपण कोविडचा मुकाबला करतो आहोत. एकीकडे या विषाणूशी लढाई सुरू असतांना दुसरीकडं आपलं जीवनचक्र सुरू राहावं, राज्यातली विकास कामं सुरूच राहावीत म्हणून आम्ही सगळे कुठेही न थांबता सातत्यानं प्रयत्न करतोय. मान देखील वर करायला वेळ मिळत नव्हता, साहजिकच माझ्या मानेच्या दुखण्याकडे नाही म्हणलं तरी थोडंसं दुर्लक्ष झालं आणि मानेवर जो परिणाम व्हायचा तो झालाच ! पण या दुखण्यावर व्यवस्थित उपचार व्हावेत यादृष्टीनं डॉक्टरांनी सल्ला दिल्यावरून मी आज रुग्णालयात दाखल होणार असून दोन तीन दिवस तिथेच राहून योग्य ते उपचार घेणार आहे.
आपले आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत, त्यामुळं लवकरच तब्येत बरी होईल अशी खात्री आहे. यानिमित्ताने एकच सांगायचं आहे. कोरोना लसींच्या बाबतीत आपण १० कोटींचा टप्पा ओलांडला असला तरी आपल्याला सर्वांना लसींचे दोन डोस घेणे अतिशय महत्वाचे आहे. आपल्या जीवनाला सुरक्षित ठेवण्यासाठी लगेचच जवळच्या केंद्रावर जाऊन लस घ्या एवढीच विनंती करतो." आपला नम्र… उद्धव बाळासाहेब ठाकरे."
आता तब्बल २२ दिवसांनी घरी परतल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना आरामाचा सल्ला दिला आहे. सध्या राज्यात एसटी बस संप, कोरोना, ओमायक्रॉन, अवकाळी पाऊस अशा अनेक समस्या उभ्या आहेत. या समस्यांवर आता मुख्यमंत्र्यांना तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.