पुणे: पावसाची संततधार, थंडीमुळे 1000 पेक्षा जास्त शेळ्या, मेंढ्यांचा दुर्दैवी मृत्यु !

उत्तर पुणे जिल्ह्यात पावसाची संततधार, तर आकडा अजुनही वाढण्याची शक्यता...
पुणे: पावसाची संततधार, थंडीमुळे 1000 पेक्षा जास्त शेळ्या, मेंढ्यांचा दुर्दैवी मृत्यु !
पुणे: पावसाची संततधार, थंडीमुळे 1000 पेक्षा जास्त शेळ्या, मेंढ्यांचा दुर्दैवी मृत्यु !Saam Tv
Published On

रोहिदास गाडगे

पुणे : उत्तर पुणे (North Pune) जिल्ह्यातील जुन्नर आंबेगाव (Ambegaon) तालुक्यात कालपासुन संततधार पाऊस आणि थंडीची हुडहुडी सर्वाधिक वाढली आहे. अशात आंबेगाव जुन्नर तालुक्यातील विविध गावांमध्ये 378 पेक्षा अधिक पाळीव शेळ्या मेंढ्यांचा मृत्यु झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

हे देखील पहा-

कालपासुन पावसाची संततधार सुरु असताना अचानक थंडीची हुडहुडी वाढली आहे. या थंडीचा सर्वाधिक फटका पाळीव जनावरांना बसलेला पहायला मिळतोय आंबेगाव तालुक्यातील 9 गावांमध्ये 188 तर जुन्नर तालुक्यातील 5 गावांमध्ये 70 आणि खेडमध्ये 45, शिरुरमध्ये 75 पेक्षा शेळ्यामेंढ्यांचा मृत्यु झाल्याने शेतक-यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

पावसाची संततधार आणि थंडीची हुडहुडी यामुळे शेळया मेंढ्यांचा मृत्यु झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाकडुन व्यक्त करण्यात आला असुन जिल्हा परिषदेच्या पशुवैद्यकिय विभागाकडुन तातडीने पंचनामे करण्याचे काम सुरु आहे.

पुणे: पावसाची संततधार, थंडीमुळे 1000 पेक्षा जास्त शेळ्या, मेंढ्यांचा दुर्दैवी मृत्यु !
मुंबईत पावसानंतर 'जोवाद' चक्रीवादळाचा धोका; हवामान खात्याचा अलर्ट !

कोरोना (Corona) महामारीच्या संकट काळात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अशातच आता शेतकऱ्याच्या पाळीव जनावरांचा मृत्यु होत असल्याने तात्काळ नुकसान भरपाई मिळण्याची मागणी शेतकरी वर्गातुन होत आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com