CM Eknath Shinde News Saam Digital
मुंबई/पुणे

Eknath shinde News: राम मंदिर लोकार्पणाच्या सोहळ्याला CM शिंदे उपस्थित राहणार का? स्वत:च सांगितलं

Vishal Gangurde

Eknath shinde News:

अयोध्येतील राम मंदिर सोहळ्याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील हजारो प्रतिष्ठित व्यक्तींना निमंत्रण मिळालं आहे. या सोहळ्याचे निमंत्रण जवळपास सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुखांना मिळालं आहे. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही निमंत्रण मिळालं आहे. मात्र, अयोध्येतील मंदिर लोकार्पणाच्या सोहळ्याला मुख्यमंत्री शिंदे जाणार नसल्याची माहिती हाती आली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वत: 'एक्स' अकाऊंटवर पोस्ट करत माहिती दिली आहे. (Latest Marathi News)

अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर लोकार्पण सोहळ्याला जगभरातील नेते उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यासाठी चोख सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे. या दिवशी देशभरातील हजारो प्रतिष्ठित व्यक्तींची उपस्थिती पाहायला मिळणार आहे. मात्र सोहळ्याला राज्यातील मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार नाहीत, अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी 'एक्स' अकाऊंटवर पोस्ट करत दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 'एक्स' अकाऊंटवर पोस्ट करत म्हणाले, 'जय श्री राम... अयोध्येत राम मंदीर उभारणीचे कोट्यवधी भारतीय आणि रामभक्त तसेच बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साकार केलं आहे. पंतप्रधान मोदी यांचे शतशः आभार...'. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

'अयोध्येमध्ये सोमवारी श्री प्रभू रामचंद्र यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे. या ऐतिहासिक आणि नेत्रदीपक सोहळ्याचे आम्हाला निमंत्रण आहेच. देशवासीयांसाठी अभिमानास्पद अशा या अभूतपूर्व क्षणाचे साक्षीदार फक्त मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजितदादा पवार अशा तिघांनीच होण्याऐवजी संपूर्ण मंत्रिमंडळ, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी आणि राज्यातील रामभक्त अशा सर्वांना घेऊन प्रभू श्री रामाचं दर्शन आम्ही घेणार आहोत. अयोध्येतल्या दर्शनाची तारीख आणि वेळ लवकरच ठरवत आहोत, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Karmayogi Abasaheb: सोलापुरात ५४ वर्षे आमदार, लोकांसाठी झटला, सर्वसामान्य नेत्याची कथा मोठ्या पडद्यावर! चित्रपटाचा ट्रेलर लाँच

Priyanka Chopra Daily Skin Care: वयाच्या ४२ व्या वर्षीही कशी राहिल त्वचा चमकदार? जाणून घ्या प्रियांका चोप्राच्या ब्युटीचं सिक्रेट

Maharashtra Politics: राजन तेलींनी भाजप का सोडली? नारायण राणेंचे नाव घेत केला थेट आरोप

Maharashtra News Live Updates: महाविकास आघाडीच जागा वाटप उद्या पूर्ण होणार

Maharashtra Assembly Election : नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का, गिरीश महाजन यांचा विश्वासू नेता तुतारीच्या वाटेवर

SCROLL FOR NEXT