sharad pawar and eknath shinde  saam tv
मुंबई/पुणे

CM एकनाथ शिंदे शरद पवारांच्या भेटीला, प्रकृतीबाबत दिली मोठी अपडेट

शरद पवार यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात सध्या उपचार सुरु आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची ब्रीच कँडी रुग्णालयात भेट घेतली आहे. शरद पवार यांच्यावर रुग्णालयात सध्या उपचार सुरु आहे. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रुग्णालयात आले होते.

भेटीनंतर एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की, शरद पवारांच्या प्रकृतीची मी विचारपूस केली. त्यांची तब्येत चांगली आहे, निमोनिया देखील रिकव्हर झाला आहे. माझ्याशी खूप चांगलं बोलले.

उद्या शरद पवार राष्ट्रवादीच्या शिबिराला जाणार आहेत. त्या शिबिरमध्ये जाऊन पुन्हा ते रुग्णालयामध्ये दाखल होणार असल्याची माहिती शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना दिली आहे. त्यांची प्रकृती चांगली आहे त्यांना उत्तम आरोग्य लाभावे यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. (Latest Marathi News)

शरद पवार यांच्यावर गेल्या दोन दिवसांपासून ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. काल त्यांना डिस्चार्ज मिळणार होता. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयात थांबावं लागलं आहे. राष्ट्रवादीच्या शिबीरलाही ते उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र त्यांनी ऑनलाईन पद्धतीने आपली उपस्थिती दर्शवली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ben Stokes : भारत-इंग्लंडच्या सामन्यांआधी मोठी बातमी! दिग्गज क्रिकेटपटूची तडकाफडकी रिटायरमेंट, क्रिडाविश्वात खळबळ

Maharashtra News Live Update: बालबेडा जंगलात माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त; पोलीस-सीआरपीएफची मोठी कारवाई

१,४०० किलोमीटर लांबी, ८ लेन; महाराष्ट्रासह पाच राज्यांना जोडणार द्रुतगती मार्ग, जाणून घ्या महामार्गाचे वैशिष्ट्ये

कितीही खासदार फोडा, उरावर भगवा फडकवणार, ओमराजेंच्या मतदारसंघात ठाकरेंची तोफ धडाडली

Spring Roll Recipe: घरच्या घरी बनवा टेस्टी स्प्रिंग रोल; वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT