CM Eknath Shinde On Road Repair Work Saam Tv
मुंबई/पुणे

CM Shinde Warns Officials: मुख्यमंत्र्यांचा पारा चढला, खड्ड्यांवरून अधिकाऱ्यांना तंबी, म्हणाले कामचुकारपणा केला तर FIR दाखल करा

CM Eknath Shinde On Road Repair Work: रस्ते दुरूस्तीच्या कामात जर कुठल्या शासकीय यंत्रणांनी अडथळा आणला किंवा कामचुकारपणा केला, तर त्याच्यावर एफआयआर दाखल करा, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत.

वैदेही काणेकर, साम टीव्ही, मुंबई

खड्ड्यांच्या मुद्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारी अधिकाऱ्यांना तंबी दिली आहे. रस्ते दुरूस्तीच्या कामात जर कुठल्या शासकीय यंत्रणांनी अडथळा आणला किंवा कामचुकारपणा केला, तर त्याच्यावर एफआयआर दाखल करा, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत. तसेच त्यांनी अधिकाऱ्यांना तातडीने काम सुरू करा, कारणं सांगून टोलवाटोलवी करू नका, असंही म्हटलं आहे.

आज राज्यभरातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या मुद्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. याच बैठकीत मुख्यमंत्री शिंदे अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रॅपिड क्वीक सेटिंग हार्डवर विथ एम ६० या पद्धतीचा वापर करून कामं करण्याचे निर्देश देखील अधिकाऱ्यांना दिले आहेत. स्थानिक जिल्हाधिकारी, एसपी यांनी कामात कोणताही अडथळा येणार नाही. वाहनांची प्रवाशांची गैरसोय होणार नाही, याची खबरदारी घ्या, असं शिंदे म्हणाले आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः हे उद्या भिवंडी - नाशिक रस्त्याची पाहणी करण्यासाठी जाणार असल्याची माहिती मिळत आहे. मुंबई अहमदाबाद हायवेमार्गे येणाऱ्या अवजड वाहनांना थांबविण्यासाठी पार्किंग लॉट तयार करण्याचे निर्देशही यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिले.

या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई अहमदाबाद महामार्गावर येणाऱ्या अवजड वाहनांना थांबवण्यासाठी पार्किंग लॉट तयार करण्याचे आदेश दिले आहेत. अवजड वाहनांमुळे वाहतूक समस्या तसेच रस्त्यांच्या समस्यांमध्ये तक्रारी वाढत असल्याने मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: रिलस्टार ते डेप्युटी कलेक्टर! दुसऱ्या प्रयत्नात केली MPPSC क्रॅक; हर्षिता दवे यांचा प्रवास

Maharashtra Live News Update : नगरमधील पॅथॉलॉजिकल लॅबचे तज्ञ डॉक्टरांवर गंभीर गुन्हे दाखल

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT