CM Eknath Shinde warning to narcotics dealers Saam TV
मुंबई/पुणे

Eknath Shinde VIDEO : आता तुमची खैर नाही, पाळंमुळं उखडून फेकणार; मुख्यमंत्र्यांचा ड्रग्ज विक्रेत्यांना इशारा

Satish Daud

मागील काही महिन्यांपासून राज्यातील प्रमुख शहरांमध्ये अंमली पदार्थांची सर्रास विक्री होत असल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. यामुळे तरुण-तरुणी नशेच्या विळख्यात सापडत आहेत. याच मुद्द्यावरून विरोधकांनी पावसाळी अधिवेशनात सरकारला लक्ष्य केलंय. दरम्यान, यावर उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे यांनी ड्रग्ज विक्रेत्यांना कडक शब्दात इशारा दिला आहे.

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस असून लक्ष्यवेळीला उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री विधानसभेत पोहचले. यापूर्वी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी पुण्यातील ड्रग्ज प्रकरणावर बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, "हॉटेल आणि पबमध्ये ड्रग्ज विक्री करून राज्यातील तरुण पिढीला बरबाद करण्याचे काम जे करीत आहेत. त्यांच्यावर आम्ही कारवाई करण्यास सुरुवात केली आहे".

"फक्त पुणेच नाही, तर संपूर्ण राज्यभरात जिथे जिथे ड्रग्ज विक्री होत असेल. शाळा कॉलेजच्या बाजूला ड्रग्ज विकले जात असेल. तर त्यांना आम्ही बिलकूल सोडणार नाही. त्यांची आता खैर नाही. ड्रग्ज विक्रीची ही पाळंमुळं आम्ही उखडून फेकण्याचं काम करत आहोत. कुणी कितीही मोठा असला तरी त्याला आम्ही सोडणार नाही', असा इशारा मुख्यमंत्री शिंदे यांनी दिला.

"सरकार राज्यातील तरुण पिढीला बरबाद होऊ देणार नाही. आम्ही सुरू केलेली बुलडोझर कारवाई जोपर्यंत शहरं पूर्णपणे ड्रग्जमुक्त होत नाहीत, तोपर्यंत सुरूच राहणार. सध्या संपूर्ण राज्यात ही कारवाई सुरू आहे. जे जे लोक ड्रग्ज विकत आहेत. त्यांच्यावर आम्ही कारवाई करत आहोत"

यात ज्या लोकांचा हात आहे, त्यांना आम्ही जेलमध्ये टाकून संपूर्ण राज्याला ड्रग्ज मुक्त करू", असंही मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. त्याचबरोबर मुंबईतील खड्डे बुजवण्यामध्ये गेल्या अनेक वर्षांमध्ये भ्रष्टाचार झालाय. ज्यांनी खड्ड्यातून काळा-पांढरा पैसा केलाय, यांच्यावर देखील आम्ही बुलडोझर चालणार, असा इशाराही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Marathi: बिग बॉसच्या ५व्या सीझनची Happy Ending; मात्र 'या' सदस्याचे केले भरभरुन कौतुक..

Bigg Boss Marathi 5 Jahnavi Killekar : बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर जान्हवीची पहिली पोस्ट म्हणाली, "७० दिवसाच्या प्रवासानंतर..."

IND vs BAN: 0,0,0,0,0,0..टीम इंडियाची स्पीड मशीन जोमात; Mayank ने पहिल्याच ओव्हरमध्ये नोंदवला मोठा रेकॉर्ड

Pune Crime : ड्रग्स, कोयते गँग, हिट अॅण्ड रन; पुणे बनलंय क्राईम कॅपिटल

Bigg Boss Marathi 5 Winner: अखेर तो क्षण आला! 'सुरज'चा गुलीगत विजय, ठरला बिग बॉस मराठी 5 व्या पर्वाचा विनर; मिळाले 'इतके' लाख रुपये

SCROLL FOR NEXT