cm eknath shinde news, nagar, farmers, house saam tv
मुंबई/पुणे

Nagar News : मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला, रात्रीत घरं उभारली गेली (पाहा व्हिडिओ)

प्रशासनाने पडझड झालेल्या घराचे दुरुस्तीचे काम सुरू केले.

Siddharth Latkar

- सुशिल थाेरात

Nagar News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde in nagar) यांच्या आदेशान्वये नगर जिल्ह्यातील वनकुटे गावातीला गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे पडझड झालेल्या घरांची बांधणी रात्रीत सुरु झाली आहे. यामुळे नुकासनग्रस्त भागात तातडीने मदत सुरु झाल्याने नागरिकांना दिलासा मिळू लागला आहे. (Maharashtra News)

नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील वनकुटे गावात (९ एप्रिल) वादळी वारा, गारपीटीसह ढगफुटीसदृश पावसाने झालेल्या नुकसानीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच बांधावर जाऊन पाहणी केली. त्यावेळी सरकार तुमच्यासोबत असून लवकरात लवकर तुम्हांला मदत केली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदेंनी शेतकऱ्यांना दिली.

वनकुटे गावाजवळील हिरामण बन्सी बर्डे, कचरू विठ्ठल वाघ यांच्या घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली होती. या पडझड झालेल्या घरांची पाहणी करून मुख्यमंत्री शिंदे यांनी शेतकऱ्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली.

त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन्ही कुटुंबांला त्वरित घरे बांधून देण्याचे आदेश दिले होते. त्यानूसार काल सायंकाळपासूनच प्रशासनाने पडझड झालेल्या घराचे दुरुस्तीचे काम सुरू केले.

रात्रीतून पत्र्याच शेड बांधून तयार झाले. तर दारात वाळू येऊन पडली आहे. आज विटा येणार असून पक्क्या बांधकामाला सुरवात होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या तत्परतेमुळे कुटुंबांना दिलासा मिळाल्याचे नितीन राधवन (सरपंच वनकुटे) तसेच लाभार्थी बन्सी बर्डे यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagarsevak Salary: तुमच्या शहरातील नगरसेवकांचा पगार किती असतो?

Maharashtra Live News Update: किसनराव हूंडीवाले हत्या प्रकरणात १० जणांना जन्मठेपेची शिक्षा

Strawberry Icecream : लहान मुलांसाठी घरच्या घरी बनवा स्ट्रॉबेरी आईसक्रिम, नोट करा रेसिपी

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींची घरोघरी जाऊन प्रत्यक्ष पडताळणी होणार; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

WhatsApp Web Update: WhatsApp झालं पुन्हा अपडेट; व्हॉइस-व्हिडिओ कॉलसाठी घेतलं महत्त्वाचा निर्णय

SCROLL FOR NEXT