Eknath Shinde News  Saam Tv
मुंबई/पुणे

Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांनी सांगितला महाविकास आघाडी बनत असतानाचा किस्सा; म्हणाले, मला राज ठाकरे यांनी...'

महाविकास आघाडी बनत असतानाचा एक किस्सा मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना सांगितला.

सूरज सावंत

Eknath Shinde News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'नागपूर थंडी, अधिवेशन आणि महासंत्तातर' या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी हजेरी लावली. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. यावेळी महाविकास आघाडी बनत असतानाचा एक किस्सा मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना सांगितला. (Latest Marathi News)

'नागपूर थंडी, अधिवेशन आणि महासंत्तातर' या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाच्या मंचावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), मनसे नेते बाळा नांदगावकर आणि शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक उपस्थित होते. लेखक राजेश कोचरेकर यांनी लिहिलेले 'नागपूर थंडी, अधिवेशन आणि महासंत्तातर' या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

मुख्यमंत्री म्हणाले, 'महाविकास आघाडी बनत असताना राज ठाकरे यांचा फोन आला होता. फोनवर ही कसली आघाडी म्हणून चेष्टा केली. निवडणूक लढवली कुणासोबत आणि युती कोणासोबत केली? पण त्यावेळी निर्णय घेण्याबाबत माझाकडे कुठलेही अधिकार नसल्याची खंत व्यक्त केली होती'.

'मुख्यमंत्रिपद पाहिजे म्हणून उठावाचा निर्णय घेतला नव्हता. नगरविकास मंत्री असताना खात्यात मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप होता. उठावाचा निर्णय घेतल्यानंतर मी कधीच घाबरलो नाही. फक्त मला माझ्या बरोबर असणाऱ्या 50 आमदारांची चिंता होती', असे मुख्यमंत्री पुढे म्हणाले.

'देवेंद्र फडणवीस जेव्हा सत्तेत होते, तेव्हा त्यांनी त्यांच्यासोबतच्या लोकांचा नेहमी विचार केला. मात्र, नंतर जेव्हा देवेंद्र फडणवीस विरोधात होते. तेव्हा त्यांच्या विरोधकांनी देवेंद्र फडणवीस यांना त्रास कसा होईल, याचाच विचार केला. मात्र मी तसं होऊ दिलं नाही, अन् मीच सत्तांतर केलं, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. आमच्या उठावाची दखल ही ३३ देशांनी घेतली आहे. स्वत: बिल क्लिन्टननेही दखल घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

दरम्यान, यावेळी शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी देखील संबोधित केले. 'कंगना रनौत आणि अर्णब गोस्वामी हे आरोप करत होते. त्यावेळी पक्षाचा प्रवक्ता म्हणून मी बोललो आणि संकटे सुरू झाली. मी मंत्री नाही म्हणून नाराज नाही. पण ठाण्याला मुख्यमंत्री लाभला. माझी कामे साहेबांकडून होतात, त्यामुळे नाराज नाही', असे प्रताप सरनाईक म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : मतदान करा पण पाडापाडी कराच; जरांगे पाटलांचे मराठा समाजाला आवाहन

Maharashtra News Live Updates: मनसे प्रमुख राज ठाकरे यांचं सोलापूर शहरात आगमन

Pune Politics: पुण्यातील कॅन्टोन्मेंटमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस सामना, कोण मारणार बाजी?

Stock Market Updates: ट्रम्प सरकार येताच शेअर बाजारात उसळी, टेक्नोलॉजीचे स्टॉक्सने घेतली भरारी

Maharashtra Politics: जाहिरातीवर खर्च केला नसता तर..., 'लाडकी बहीण' योजनेवरून ठाकरे गटाच्या नेत्याचा सरकारवर निशाणा

SCROLL FOR NEXT