Eknath shinde
Eknath shinde  saam tv
मुंबई/पुणे

Eknath Shinde | लढाई अवघड होती, ३० वर्षानंतर मुख्यमंत्री झालो : एकनाथ शिंदे

साम टिव्ही ब्युरो

सुमित सावंत

Eknath Shinde News : 'मॅरेथॉनवाले पळतात, पण आम्ही देखील पळतो आणि पळवतो. भूमिका बजवावी लागते. पण तुम्हाला पदक मिळते. आम्हाला पहिलं येऊन पदक मिळत नाही. माझी लढाई अवघड होती, ३० वर्ष धावल्यानंतर मुख्यमंत्री झालो, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते टाटा मुंबई मॅरेथॉन २०२३ उद्घाटन झाले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, 'आम्ही एक मोठी शर्यत जिंकून आलो आहे. मुंबई व्हाया सुरत व्हाया गुवाहाटी. आमची मॅरेथॉन अवघड होती. पण आम्ही मॅरेथॉन पार केली आणि जिंकलो. मुंबई मॅरेथॉनची वाट जगातील सगळे लोक पाहत असतात. मागील दोन वर्षात कोव्हिडमुळे मॅरेथॉनचे आयोजन करता आले नाही.'

'यंदा जगातील सगळ्यात मोठी मॅरेथॉन यंदा होत आहे. जगातील सगळ्यात मोठी मॅरेथॉन आहे. ही देखील आमची मोठी कामगिरी आहे. काही दिवसांपूर्वी उद्योजक रतन टाटा यांना भेटलो, ते सरकारसोबत हातात हात घेऊन राज्य पुढे नेऊ म्हणाले. त्यांचं योगदान टाटा मुंबई मॅरथॉनमध्ये खूप मोठं आहे. या मॅरेथॉनसाठी जगभरातील इच्छुकांसाठी नोंदणी आज सुरू होते आहे', असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, 'आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटलो. त्यांनी बराच वेळ आम्हाला दिला. पंतप्रधान मोदी म्हणाले सर्व जनतेला न्याय देणार सरकार हवं आहे. मी जे विधान भवनात भाषण दिलं, हृदयातून बोललो. ते मोदींना आवडलं. सर्व लोकांना लोकांना या सरकारमध्ये संधी द्या म्हणाले. तसेच केंद्र सरकार हे राज्य सरकारला मदत करेल असेही त्यांनी सांगितले. हे डबल इंजिनवाले सरकार आहे. पण हे जलद धावणार. आम्हाला 'हाफ मॅरेथॉन'ची संधी मिळाली, पुढच्या वेळी फुल मॅरेथॉन करूच'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Voting LIVE : लोकसभेच्या पाचव्या टप्प्यासाठी थोड्याच वेळात मतदान

Heavy Rain Alert : मान्सून अंदमानात दाखल होताच वातावरण बदललं; या भागात तुफान पाऊस कोसळणार

Rashi Bhavishya: आजचे राशिभविष्य, २० मे २०२४ : मेषसह ४ राशींना मिळणार नशीबाची उत्तम साथ, तुमची रास कोणती?

Horoscope Today: तुमच्यासाठी सोमवार सुखाचा ठरेल की दुखाचा? वाचा राशिभविष्य

31km मायलेज, Z सीरीज इंजिन; पहिल्यांदाच सनरूफसह येणार मारुतीची नवीन कार

SCROLL FOR NEXT