CM Eknath Shinde Cricket Batting
CM Eknath Shinde Cricket Batting Saam TV
मुंबई/पुणे

VIDEO : क्रिकेटच्या मैदानावर CM शिंदेंची फटकेबाजी; पुल शॉट असा खेळला की कार्यकर्ते पाहातच राहिले!

Satish Daud-Patil

रुपाली बडवे, साम टिव्ही

मुंबई : महाराष्ट्रातील राजकारणात आपल्या शैलीने फटकेबाजी करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी क्रिकेटचं मैदानही गाजवलं आहे. शिंदे यांनी चक्क क्रिकेटच्या मैदानावर उतरून जोरदार फटकेबाजी केली. चौकार, षटकारांची आतषबाजी करत शिंदे यांनी हम भी कुछ कम नही हे दाखवून दिलं आहे.  (Latest Marathi News)

साक्षात मुख्यमंत्र्यांनाच तुफान फटकेबाजी करताना पाहून त्यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांस खेळाडूंचाही चांगलाच उत्साह वाढला. गिरगावातील बाळासाहेबांची शिवसेना शाखा क्रमांक 218 ने आयोजित केलेल्या गिरगाव प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी नुकतीच हजेरी लावली.

यावेळी त्यांना क्रिकेटचा मोह आवरला नाही. कार्यकर्त्यांनी तसेच मैदानातील खेळाडूंनी केलेल्या आग्रहाखातर शिंदे हे मैदानात उतरले. यावेळी त्यांनी जोरदार फटकेबाजी केली. मुख्यमंत्री शिंदेंना क्रिकेट खेळताना पाहून कार्यकर्त्यांचा देखील चांगलाच उत्साह वाढला. (Maharashtra Political News)

काही वेळ क्रिकेटच्या मैदानात फटकेबाजी केल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी आगामी सामन्यातील खेळाडूंना स्टेजवर बोलवत टॉसही उडवला. तर आधीच्या सामन्यात उत्कृष्ट खेळ खेळणाऱ्या खेळाडूंचा बक्षीस देऊन सन्मान केला.

यावेळी गिरगावचा शाखा क्रमांक 218 चे शाखाप्रमुख ललित माधव, ठाण्यातील उपविभागप्रमुख अमित लोटलीकर आणि गणेश गोळे, राहुल पवार,राकेश साळवी आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि या स्पर्धेत सहभागी झालेले खेळाडू उपस्थित होते.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : नागपूरसह विदर्भाच्या काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

Narendra Modi News | मोदींच्या सभेत कांद्यावरुन शेतकऱ्यांची घोषणाबाजी

Mumbai Metro: पीएम मोदींच्या रोड शोमुळे मेट्रोसेवा राहणार बंद, आताच करा प्रवासाचे नियोजन

PBKS vs RR: पंजाब - राजस्थान सामना रद्द होणार? समोर आली मोठी अपडेट

Amravati: अमरावतीत रक्ताचा तुटवडा, रक्तदात्यांना, सामाजिक संस्थांसह गणेशाेत्सव मंडळांना रक्तदानाचे आवाहन

SCROLL FOR NEXT