Eknath Shinde, Balasaheb Thackeray
Eknath Shinde, Balasaheb Thackeray Saam Tv
मुंबई/पुणे

Balasaheb Thackeray Jayanti: बाळासाहेबांमुळेच सर्वसामान्य कार्यकर्ते मोठ्या पदांवर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं अभिवादन

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळेसाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या जयंतीनिमित्त आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे. विधानभवनातही आज बाळासाहेबांच्या तैलचित्राचं अनावरण करण्यात येणार आहे. त्याआधी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळे आज मी मुख्यमंत्री पदावर आहे, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.

माझ्या जीवनात जे काही आहे ते सारं योगदान बाळासाहेबांचंच आहे. आम्ही आज जे काही आहोत ते त्यांच्यामुळेच आहोत. राज्यातील आजचं सरकार आज त्यांच्यामुळेच आहे. त्यांचे विचार त्यांची शिकवण हे सरकार पुढे नेत आहे,असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.

बाळासाहेबांची आठवण येत नाही असा एकही क्षण नाही. त्यांची सर्वसामान्यांना न्याय देणारी शिकवण आहे. त्याच विचारांच्या आधारावर हे सरकार स्थापन करण्यात आलं आहे. बाळासाहेबांमुळेच सर्वसामान्य कार्यकर्ते अनेक मोठ्या पदांवर आहेत, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.

बाळासाहेबांच्या तैलचित्र अनावरणाच्या सोहळ्यासाठी उद्धव ठाकरे यांच्यासह ठाकरे कुटुंबियांना आमंत्रित करण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्याशी बोललो असून हा सोहळा अतिशय भव्यदिव्य असा होणार असल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sonalee Kulkarni : दुबईमध्ये उगवली शुक्राची चांदणी; साडीत खुललं अप्सरेचं सौंदर्य

Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत भर; नायब राज्यपालांनी केली NIA द्वारे चौकशीची मागणी, काय आहे नेमकं प्रकरण?

Today's Marathi News Live: विजय वडेट्टीवार यांच्याविरुद्ध भाजपची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार

JP Nadda: भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याविरोधात गुन्हा दाखल, जाणून घ्या काय आहे प्रकरण

Ratnagiri News : निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, रत्नागिरीत 3 कोटींची रोकड जप्त.. | Marathi News

SCROLL FOR NEXT