Eknath shinde  saam tv
मुंबई/पुणे

Eknath Shinde : राज्यात अपघाताचं प्रमाण कमी करण्यासाठी राज्य सरकारचं महत्वाचं पाऊल; मुख्यमंत्र्यांनी दिले 'हे' आदेश

रस्त्यावरील वाढलेल्या रस्ते अपघातांबाबत मुख्यमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

सूरज सावंत

Eknath Shinde News : राज्यात रस्त्यावर वाहनांचा अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे रस्त्यावरील वाढलेल्या रस्ते अपघातांबाबत मुख्यमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली आहे. अपघात रोखण्यासाठी तातडीने उपाय योजना करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. (Latest Marathi News)

मोटर वाहन निरीक्षक भरती २०२२ मधील उमेदवारांना आज प्रजासत्ताक दिनी मुख्यमंत्र्यांनी 'वर्षा' या शासकिय निवासस्थानी नियुक्तीपत्र वाटले. यानंतर मुख्यमंत्र्यांनी राज्यातील वाढत्या अपघातांवर चिंता व्यक्त केली.

राज्यात अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करणं गरजेचं आहे. अपघातात ७४ टक्के मृत्यू हे ग्रामीण भागातले तर २० टक्के महामार्गांवरचे आहेत, याचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी घेतला.

ग्रामीण भागात खराब रस्ते, दिवे नसणे, विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांमुळे हे अपघात (Accident) होत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. यानंतर धोकादायक क्षेत्र रस्ते जिथे आहेत, तिथे पोलिसांची गस्त ठेवा.

राज्यातील धोकादायक क्षेत्रांच्या आढावासाठी मुख्यमंत्री अधिकाऱ्यांसोबत विशेष बैठक घेऊन अपघाती क्षेत्रांवर लक्ष केंद्रीत करून अपघात रोखण्याबाबत उपाय योजना करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

राज्यातील रस्त्यांवर धोकादायक क्षेत्र नागरिकांच्या लक्षात येतील, या अनुषंगाने सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. तसेच शहरातील रस्त्यांना महापालिका किंवा नगरविकास खात्यातून आर्थिक मदत ही देता येते का, याचीही पडताळणी करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यानी दिल्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: भंयकर वास्तव! पाय ठेवायला जागा नाही, तरीही भाऊचा लोकलच्या दारात उभं राहून प्रवास, व्हिडीओ पाहा

Solapur Airport : सोलापूरकरांचे नागरी विमानसेवेचे स्वप्न साकार! २० डिसेंबरपासून मुंबई आणि गोवासाठी विमानसेवा

Viral Video: नजर हटी... मोबाइलच्या नादात भरकटला, दुचाकी थेट कारला धडकली, थरारक घटना कॅमेऱ्यात कैद!

Astrology: आजपासून 'या' राशींचे दिवस चमकणार, शनीची साडीसती संपणार

Supreme Court: चुकीच्या वक्तव्याची तुलना द्वेषपूर्ण भाषणाशी होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले

SCROLL FOR NEXT