eknath shinde and uddhav thackeray  saam tv
मुंबई/पुणे

शिवसेनेचा रिमोट कंट्रोल राष्ट्रवादीच्या हातात गहाण टाकला; मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल

दसरा मेळाव्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदारी टीका केली.

Vishal Gangurde

Dasara Melava 2022 : शिंदे गटाच्या बंडखोरीमुळे शिवसेनेत (Shivsena) उभी फूट पडली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदा दोन दसरा मेळावा होत आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाने बीकेसी मैदानावर भवदिव्य दसरा मेळाव्याचे आयोजन केले. या मेळाव्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदारी टीका केली. (Eknath Shinde News In Marathi )

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यातून बीकेसी मैदानातून उपस्थितांना संबोधित केले. एकनाथ शिंदे म्हणाले, 'तुम्ही न्यायालयात जाऊन शिवाजी पार्क मिळवलं. आपल्याला सांगू इच्छितो की, शिवाजी पार्क मैदान आम्हाला मिळालं असतं.पण मुख्यमंत्री म्हणून कायदा सुव्यवस्था हाताळायचा आहे. शिवसेनेचे विचार आमच्या सोबत आहे. त्यांनी सत्तेच्या हव्यासापोटी हिंदुत्वाच्या मूठमाती दिली. बाळासाहेबांच्या विचारांना मूठमाती दिली'.

'शिवाजी पार्कच्या जागेवर उभा राहण्याचा अधिकार आहे का? हजारो शिवसैनिकांनी रक्त सांडून पक्ष उभा केला. पण सत्तेसाठी पक्ष काँग्रेस-राष्ट्रवादीकडे गहाण टाकला. बाळासाहेब रिमोट कंट्रोलने सरकार चालवायचे. पण तुम्ही शिवसेनेचा रिमोट कंट्रोल राष्ट्रवादीच्या हातात गहाण टाकला. तुम्ही राष्ट्रवादीच्या तालावर नाचायला लागला. आम्हालाही नाचायला लावलं, असेही ते पुढे म्हणाले.

'तुम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दावणीला शिवसेना बांधली होती. त्यामुळे हिंदुत्वासाठी आम्ही भूमिका जाहीरपणे घेतली. लोकांचा आशीर्वाद मिळतोय. जर आम्ही चुकलो असतो, बेईमानी केली असती तर एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला असता का ? ही शिवसेना ना उद्धव ठाकरेंची ना शिंदेची ही फक्त बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची आहे, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime news: धक्कादायक! 'जेवणात चिकन का नाही', पती जोरजोरात ओरडला; वैतागलेल्या पत्नीने विळ्याने चिरला गळा

Riteish Deshmukh Hairstyles: पांढऱ्या केसांपासून ते पोनीपर्यत.. रितेश भाऊच्या 10 हेअरस्टाईने लावलं 'वेड'; PHOTO

Trending Chappal Design : नऊवारी साडी असो नाहीतर वनपीस, फॅशनच्या दुनियेत 'ही' चप्पल कायम १ नंबर

Maharashtra News Live Update: जालन्यात पारा ४२ अंशावर, हवामान विभागाकडून उष्णतेच्या लाटेचा 'यलो अलर्ट'

Ladki Bahin Yojana eKYC: आधार नंबर टाकूनही ओटीपी येत नाही; लाडक्या बहिणींना ईकेवायसी करताना अडचणी

SCROLL FOR NEXT