Eknath Shinde News  Saam Tv
मुंबई/पुणे

Eknath Shinde News: शिवसेना-वंचित बहुजन आघाडीच्या युतीच्या घोषणेनंतर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

नव्या युतीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या आहे.

जयश्री मोरे

Shivsena-VBA Alliance : शिवसेना ठाकरे गट आणि आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची अधिकृत घोषणा आज करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत युतीची घोषणा केली आहे. शिवसेना ठाकरे गट आणि आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीमुळे राज्यात नवीन राजकीय समीकरण पाहायाला मिळणार आहे. या नव्या युतीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या आहे. (Latest Marathi News)

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या मुंबईतील काळा घोडा येथील पुतळ्यास पुष्पहार आणि अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचले. या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गट आणि आणि वंचित बहुजन आघाडीच्या नव्या युतीवर भाष्य केलं. 'भीम शक्ती आणि शिव शक्ती एकत्र, प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना शुभेच्छा, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीला शुभेच्छा दिल्या.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना देखील शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, 'बाळासाहेबांनी नेहमीच सर्वांना न्याय दिला. हे सरकार बाळासाहेबांच्या विचारावर आधारीत आहे. हे जनसामान्यांचं सरकार आहे'.

दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी आज बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी चुकून स्मृतीदिनाचं ट्विट केलं. त्यानंतर अवध्या २० मिनिटात आदित्य ठाकरे यांनी ट्विट डिलीट केलं. यावरून सत्ताधाऱ्यांकडून आदित्य ठाकरेंवर जोरदार टीका होत आहे.

यावरून मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला असता, मुख्यमंत्री म्हणाले, 'ज्यांनी ट्विट केलंय त्यांनाच विचारा. बाळासाहेबांची आठवण येत नाही, असा एकही क्षण आमचा जात नाही. बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श आणि त्यांचे विचार पुढे घेऊन जात आहोत'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Parenting Tips : मुलांना ओरडल्यानंतर पालकांनी चुकूनही करू नका 'ही' चूक, विश्वासाचं नातं एका क्षणात तुटेल

Pune : पुण्यात पोलिसांनीच केले पोलिसांचे 'स्टिंग ऑपरेशन'! डमी डिलिव्हरी बॉय बनवून केला मोठा पर्दाफाश

Actor Home Fraud: मराठमोळ्या अभिनेत्याची २५ लाखांची फसवणूक; न्यायासाठी वर्षभरापासून करतोय धावपळ

Shocking : पनवेल हादरलं! तरुणाने अल्पवयीन मुलीला सार्वजनिक शौचालयात नेले, लैंगिक अत्याचार केले अन्...

SCROLL FOR NEXT