Uddhav Thackeray and Eknath Shinde Saam Digital
मुंबई/पुणे

Eknath Shinde : ती लिफ्ट ६व्या मजल्यापर्यंत पोहोचू शकत नाही; फडणवीसांच्या भेटीनंतर CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला, VIDEO

CM Eknath Shinde on Uddhav thackeray : उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या एकत्र प्रवासावर मुख्यमंत्री शिंदे यांनी जोरदार टीका केली आहे. ती लिफ्ट ६ व्या मजल्यापर्यंत पोहोचू शकत नाही,अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी टीका केली.

Vishal Gangurde

मुंबई : महाराष्ट्र राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनचा आज गुरुवारी पहिला दिवस आहे. या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकाच लिफ्टने प्रवास केला. यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. या दोन्ही नेत्यांच्या एकत्र प्रवासावर राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या. त्यानंतर यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. 'ती लिफ्ट ६ व्या मजल्यापर्यंत पोहोचू शकत नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

मुख्यमंत्री शिंदे यांनी विधीमंडळात पोडियमवर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांच्या भेटीवर भाष्य केलं. देवेंद्र फडणवीसांच्या भेटीवर बोलताना शिंदे म्हणाले, 'त्यांची लिफ्ट ६ व्या मजल्यापर्यंत पोहोचू शकत नाही. त्यांनी लिफ्ट शिफ्ट केली. आम्ही जनतेच्या लिफ्टमध्ये गेलो. ते काँग्रेसच्या लिफ्टमध्ये गेले'.

एनडीए सरकारवर भाष्य करताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'काही लोक बोलत आहेत. काही लोक आनंद व्यक्त करत आहेत. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यामुळे पेढे वाटत आहेत. भाजपने २४० जागा जिंकल्या. त्याच्या सर्वांच्या मिळून तितक्या जागा आल्या नाही. काही लोक छाती फुगवून येणारे पाहतोय. देशात खोटे नरेटिव्ह पसरवलं. संविधान बदलणार साऱख्या खोट्या बातम्या पसरवूनही मोदी सत्तास्थानी पोहोचले'.

शेतकऱ्यांसाठी 'लाडका भाऊ' योजना अंमलात आणा, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं होतं. त्यावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'मी एकच सांगतो. लाडका भाऊ पण करू. पण बोलणाऱ्याचे भाऊ कुठे आहेत. त्यांनी विचार करावा. सगळे भाऊ सोडून का गेले? आम्ही सर्व भाऊ आणि बहिणींचा विचार करणार आहोत'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aayush Komkar: शेवटी सूड घेतलाच! वनराजच्या अंत्यविधीला शस्त्रपूजन करत बदला घेण्याची शपथ, अन् १ वर्षाने आयुष कोमकरची हत्या

Shocking : संतापजनक! मुलाच्या हव्यासापोटी जन्मदात्याने मुलीला संपवलं; बिहार हादरलं

चांदीच्या पालखीतून निघाला पुण्याचा पहिला मानाचा कसबा गणपती|VIDEO

'...नाहीतर तुझे डोळे बाहेर काढेन' प्रसिद्ध कंटेट क्रिएटरच्या ब्लाऊजकडे पाहत राहिला, बस प्रवासात आजोबाचा प्रताप

Sunita Ahuja: ४० वर्ष सोबत राहणं सोपी गोष्ट...; गोविंदासोबत घटस्फोटाच्या अफावांवर पत्नी सुनीता आहुजा स्पष्टचं बोलली

SCROLL FOR NEXT