eknath shinde and uddhav thackeray  saam tv
मुंबई/पुणे

Eknath Shinde : 'मी ३० जून रोजी शस्त्रक्रिया केल्यानंतर बरेच जण तडातड बरे झाले'; मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना टोला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.

साम टिव्ही ब्युरो

Eknath Shinde News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला. ' मी काही डॉक्टर नाही. पण मी देखील एक शस्त्रक्रिया ३० जून रोजी केली. ती शस्त्रक्रिया यशस्वी देखील झाली. त्यानंतर बरेच लोक मला डॉक्टर बोलू लागले. त्यामुळे बरेच जण तडातड बरे झाले, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. (Latest Marathi News)

मुंबईत बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष वर्धापन दिनानिमित्त वैद्यकीय सेवा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार रामदास आठवले यांनी उपस्थिती दर्शवली. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, 'मी ३० जून रोजी केलेली शस्त्रक्रिया यशस्वी ठरली. त्यानंतर काही लोकांनी सोशल मीडियावर एकनाथ शिंदे फिटनेस सेंटर नाव टाकले. माझ्या शस्त्रक्रियेनंतर काही लोकांचा मास्क गेला. काही लोकांचं आणखी काही गेलं. पटापट निघालं. पन्नास फुटाचं अंतर कमी झालं. सर्वांचे बंद झालेले दरवाजे उघडे झाले. त्यामुळे मी थोडाफार डॉक्टर आहे'.

'आपण काम करत राहू. काही लोक आरोप करत राहतील. मी कुठेतरी बघितलं की, कोलकात्यात २० कोटी रुपयांसाठी एक टेम्पो लागला. मग ५० कोटी रुपयांसाठी एक ट्रक लागेल. मग ५० गुणिले ५० ? मग किती लागेल. जाऊद्या, काही जण खोक्यावर काहीही बोलतात. त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. त्यांना मानसिक उपचाराची गरज आहे. ठाण्यात ते उपचार सुद्धा आहेत', अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: TCS प्रकरणात सरकारी वकील म्हणून अजय मिसर यांनी काम पाहावं, पोलीस आयुक्तांचे सरकारला पत्र

Saturday Horoscope: शनिदेव होणार या ५ राशींवर होणार प्रसन्न, खर्च वाढेल; वाचा शनिवारचे खास राशीभविष्य

Shivali Parab Photos: 'किती दिवस घालणार एकच...' नव्या फोटोशूटमुळे शिवाली परब झाली ट्रोल

Cholesterol medicine: कोलेस्ट्रॉलची औषधं मध्येच थांबवली तर काय होतं? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

Pohe Nachni Handvo Recipe: हेल्दी आणि टेस्टी नाश्ता खायचा आहे? मग घरी झटपट बनवा पोहे आणि नाचणी हांडवो

SCROLL FOR NEXT