Eknath Shinde News  Saam Tv
मुंबई/पुणे

CM Eknath Shinde : '...अन् बिनकामाचे काढतात मोर्चा'; मुख्यमंत्र्यांची विरोधकांवर जोरदार टीका

मुख्यमंत्री एकनात शिंदे यांनी महाविकास आघाडीच्या महामोर्च्यावर जोरदार टीका केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Eknath Shinde News : मुख्यमंत्री एकनात शिंदे यांनी महाविकास आघाडीच्या महामोर्च्यावर जोरदार टीका केली आहे. महाविकास आघाडीच्या महामोर्च्यात विरोधकांच्या आरोपालाही मुख्यमंत्र्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 'आम्ही काम करणारे आहोत. त्यामुळे काम करणाऱ्यांची होते चर्चा आणि बिनकामाचे काढतात मोर्चा, असा टोला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला आहे. (Latest Marathi News)

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे मुख्य नेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत कांदिवली-मुंबई येथील शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे या पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांच्या पक्षात प्रवेश केला. या प्रवेश कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही जोरदार टीका केली.

'आमचं सरकार भक्कम आहे. ते डबल इंजिन सरकार आहे. २ लाख कोटी विकासासाठी दिलेले आहे. कोणी म्हणाले एक महिन्यात हे सरकार पडेल, आता पाच महिने झाले. हे सरकार मजबूत आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. 'लफंगे कोण आहे? लफंगेगिरी कोणी केली हे सर्वांना माहित आहे. खुर्ची मिळवण्यासाठी आणि बाळासाहेबाचे विचार सोडून कोणी काय केले हे सर्वानी पाहिले आहे. त्यामुळे मला जास्त बोलावसं वाटतं, असे प्रत्युत्तर मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांना दिलं.

'जे आपल्या हिंदू देवतांना अपमान करतात, ते देखील त्यांच्या व्यासपीठावर होते. हे आपलं दुर्दैव्य आहे, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. तर मंत्रिमंडळ विस्तारावर भाष्य करताना मुख्यमंत्री म्हणाले, 'मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल. आम्ही काम करणारे आहोत. त्यामुळे काम करणाऱ्यांची होते चर्चा आणि बिनकामाचे काढतात मोर्चा, असा टोला मुख्यंत्र्यांनी विरोधकांना लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Idli- Dosa For Diabetes: डायबिटीजचे रूग्ण इडली, डोसा खाऊ शकतात का? जाणून घ्या ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहण्यासाठी काय खावे?

Gold Price Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अचानक भाव घसरला; किती रुपयांनी झालं स्वस्त?

Maharashtra News Live Update: जळगावात पुन्हा भीषण अपघात टँकरच्या धडकेत आयटीआय विद्यार्थ्याचा मृत्यू; दोन जखमी

पुण्यात अवघ्या १३ लाखांत हक्काचं घर, म्हाडाचा ४४६२ फ्लॅटचा धमाका, लोकेशनची नावं समोर, वाचा A टू Z माहिती

Bank Holiday List: उद्या बँकेत काम असेल तर थांबा! महाराष्ट्रासह अनेक राज्यांत बँका बंद

SCROLL FOR NEXT