Maratha Reservation  Saam TV
मुंबई/पुणे

Maratha Reservation Update : मराठा आरक्षणाबाबत सरकारकडून हालचालींना वेग; मुख्यमंत्र्यांनी शिंदे समितीची बोलावली तातडीची बैठक, सूत्रांची माहिती

Maratha Reservation Update : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला २४ डिसेंबरची मुदत दिली आहे. मात्र राज्य सरकार दोन पर्यायांवर काम करत आहे.

सूरज सावंत

Mumbai News :

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणासाठी दिलेला अल्टिमेटम जवळ येत आहे, तसं सरकारवरील दबाव वाढत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सरकारला २४ डिसेंबरपर्यंतची वेळ दिली आहे. त्यावर ते ठाम आहेत. दुसरीकडे सरकारने देखील हालचाली सुरु केल्या आहेत.

मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर नेमलेल्या शिंदे समितीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तातडीची बैठक बोलावली आहे. आज दुपारी १ वाजता ही बैठक मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थान वर्षा येथे होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला २४ डिसेंबरची मुदत दिली आहे. मात्र राज्य सरकार दोन पर्यायांवर काम करत आहे. यासाठी सरकारला वेळ वाढवून द्या, अशी मागणी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांच्या शिष्टमंडळाने मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याकडे केली होती. (Latest Marathi News)

मात्र मनोज जरांगे पाटील वेळ वाढवून न देण्याच्या आपल्या निर्णयावर ठाम असल्याने सरकारकडून आता हालचालींना वेग आला आहे. या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे समितीने आतापर्यंत विविध जिल्ह्यात जाऊन केलेल्या कामाचा आढावा घेणार आहे.

शिंदे समितीचा आरक्षणाचा जर दुसरा अहवाल आज समितीने सुपूर्द केला, तर तो अहवाल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडून मुख्यमंत्री सोमवार किंवा मंगळवारी विधीमंडळात ठेवण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rain Alert: गणरायाच्या आगमनासोबत राज्यात पावसाने जोर पकडला, हवामान खात्याकडून अलर्ट जारी; कोणत्या जिल्ह्यांना झोडपून काढणार?

Maharashtra News Live Update: मयूर रथातून होणार दगडूशेठ गणपती बाप्पाची आगमन मिरवणूक

Hartalika Fast : हरतालिकेचा उपवास कधी सोडावा? योग्य वेळ काय? जाणून घ्या

Monday Horoscope: गणरायाचे आगमन अन् 'या' ३ राशींचे नशीब चमकणार; धनलाभासोबत मिळेल मोठी खुशखबर!

भारतानं आठव्यांदा जिंकला महिला आशिया कप; फायनलमध्ये श्रीलंकेला 72 धावांनी हरवलं,शेफाली-स्मृतीसह श्री चरणीची शानदार कामगिरी

SCROLL FOR NEXT