मुंबई : महायुतीतील भाजपने ९९ उमेदवारांची यादी जाहीर केली. भाजपनंतर आता शिंदे गट उमेदवार जाहीर करणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. विधानसभा रणधुमाळी सुरु असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उमेदवारांची अधिकृत जाहीर करण्याआधी पहिल्या उमेदवाराची घोषणा केली आहे. मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांचं स्वागत केलं. तसेच विधानसभेत चंद्रकांत पाटील विजयी होणार असल्याचा दावा केला आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे यांच्या राज्यभरात गाठीभेटी वाढल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या जळगावच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी जळगावात मुक्ताईचे दर्शन घेतलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, 'येत्या एक दोन दिवसांत संपूर्ण यादी जाहीर करणार आहे. अंतिम जागा लवकरच जाहीर होईल. गेल्या सव्वादोन वर्षांच्या कामाची पोच पावती नक्की मिळेल. महायुतीचा उमेदवार म्हणून चंद्रकांत पाटील विजयी होणार आहे. अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांचं शिवसेनेत पुन्हा स्वागत आहे'.
'लाडक्या बहिणी काहीही करू शकतात. आजच्या सभेची गर्दी पाहून समजते. मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात आम्ही ५ हजार कोटींची कामे दिली आहेत. लाडकी बहीण योजना चुनावी जुमला आहे, असे सांगितले जाते, मी बाळासाहेब ठाकरे आणि दिघे साहेबांचा शिवसैनिक असून एकदा जे बोलतो, तेच करतो. आचारसंहिता लागल्यावर हे लोक खोडा घालतील म्हणून आम्ही आधीच पुढच्या २ महिन्याचे पैसे दिले आहे. लाडकी बहिणींची योजना बंद व्हावी म्हणून यांनी हायकोर्टात पाठवले, पण त्याला हायकोर्टाने थोबाडीत दिली, असे मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले.
'लाडकी बहीण योजना कोणता मायका लाल आला तरी थांबवणार नाही, योजना चालू ठेवणार आहे. तुम्ही साथ दिली आणि आशीर्वाद दिलेत तर २००० काय २५०० होतील. तुम्ही अजून चांगले आशीर्वाद दिले तर ३००० पण होतील. सरकार म्हणून आम्ही राज्यात सर्वच योजना चांगल्या चालवल्या आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.