गिरीश कांबळे, साम टीव्ही मुंबई
मालवण तालुक्यात राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. त्यानंतर देशभरातली शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट आहे. त्यामुळे राज्य सरकार अॅक्शन मोडमध्ये आलंय. या घटनेसंदर्भात विस्तृत तपास करण्यासाठी एक तांत्रिक समिती नेमण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलाय. ही समिती जबाबदारी निश्चित करेल, अशी माहिती त्यांनी दिलीय.
एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
छत्रपती शिवाजी महाराजांचा नवीन पुतळा तयार करण्याचा निर्णय देखील सरकारने घेतलेला (Rajkot Fort Issue) आहे. शिवरायांच्या कर्तुत्वाला साजेसा, भव्य अन् अत्युत्कृष्ट पुतळा उभारण्याच्या दृष्टीने देशामधील उत्तम शिल्पकार, स्थापत्य अभियंते, तज्ञ, नौदलाचे अधिकारी यांची देखील एक समिती नेमण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेत.
नौदल-राज्य सरकार अॅक्शन मोडवर
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्यासंदर्भातील दुर्घटनेवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यावर महत्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण, मुख्य सचिव सुजाता सौनिक, अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) इक्बाल सिंग चहल, (Shivaji Maharaj Statue) अतिरिक्त मुख्य सचिव नगर विकास असीम गुप्ता, अतिरिक्त मुख्य सचिव सार्वजनिक बांधकाम मनिषा म्हैसकर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, व्हाईस ऍडमिरल अजय कोचर, रियर ऍडमिरल मनीष चढ्ढा, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, शिल्पकार राम सुतार, विनय वाघ, शशिकांत वडके उपस्थित होते.
शिवरायांच्या नव्या पुतळ्यासाठी समिती स्थापन
छत्रपती शिवाजी महाराजांचा नवा पुतळा बनविण्यासाठी देखील एक समिती स्थापन करण्यात येणार (Shivaji Maharaj Statue Collapsed) आहे. छत्रपतींच्या पुतळ्याला नव्यानं पुन्हा भव्य स्वरुपात तयार करण्यासाठी जेजे स्कूल ऑफ आर्टस, स्थापत्य अभियंते, आयआयटी, महाराष्ट्रातील नामांकित शिल्पकार, तसेच नौदलाचे तांत्रिक अधिकारी यांची देखील एक समिती देखील नेमण्याचे निर्देश एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिलेत. भविष्यात अशी दुर्घटना घडू नये, यासाठी काळजी घेतली पाहिजे. उभारण्यात येणारा शिवाजी महाराजांचा पुतळा त्यांच्या लौकिकाला साजेसा हवा. त्यासाठी कुठेही निधी कमी पडू दिला जाणार नसल्याचं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.