Eknath SHinde- Devendra Fadnavis Saam Tv
मुंबई/पुणे

Guhagar Politics: निलेश राणेंच्या कारवरील दगडफेक प्रकरणावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

BJP Vs Thackeray Group Clash : दगडफेकीनंतर गुहागरमध्ये ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्ते एकमेकांना भिडले. या घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.

Vishal Gangurde

Maharashtra Political News :

गुहागरमध्ये ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि भाजपचे कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाल्याची घटना घडली. या वादात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी निलेश राणे यांच्या ताफ्यातील कारवर दगडफेक केली. तसेच या दगडफेकीनंतर गुहागरमध्ये ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्ते एकमेकांना भिडले. दोन्ही गटामध्ये झालेल्या भांडणानंतर परिसरातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. (Latest Marathi News)

गुहागरमध्ये भास्कर जाधव यांच्या समर्थकांकडून निलेश राणे यांच्या कारवरील दगडफेक प्रकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, 'मी या घटनेची माहिती घेणार आहे. मी एकच सांगतो,कायदा कोणीही हातात घेऊ नये. कायदा सर्वांना समान आहे. जे कायदा हातात घेईल, त्यांच्यावर कठोर कारवाई होईल. हे महाराष्ट्र राज्य आहे. राज्यात कोणीही कायदा हातात घेऊ नये'.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गुहागरमधील घटनेवर देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली. निलेश राणे यांच्या कारवरील हल्ला प्रकरणावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'हल्ले करून कोणीच कोणाला थांबवू शकत नाही. ज्या प्रकारची राजकीय संस्कृती आणण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात होत आहे, निश्चितपणे याची निराशा ही त्यातून पाहायला मिळत आहे. जी घटना घडली आहे त्यात योग्य कारवाई करू'.

पत्रकार निखिल वागळे हल्ला प्रकरणावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'ही भाजपची संस्कृती मुळीच नाही. त्यांनी ज्या प्रकारचे शब्द पंतप्रधान मोदी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्या बद्दल वापरले हे शोभनीय नाही. भाजप कार्यकर्त्यांना माझं नेहमीच सांगणं की कायदा हातात घेऊ नका'.

भास्कर जाधव यांची पोलिसांत तक्रार

गुहागरमध्ये आमदार भास्कर जाधव यांच्या कारमध्ये जोरदार राडा झाला. गुहागरमधील दोन राजकीय गटाचा राडा झाल्यानंतर परिसरात राजकीय वातावरण चांगलंच तापलं. या घटनेनंतर पोलिसांनाही हस्तक्षेप करावा लागला. गुहागरमधील घटनेनंतर आमदार भास्कर जाधव यांनी पोलिसांत धाव घेतली आहे.

भास्कर जाधव यांनी पोलिसांत तक्रार दिली. भास्कर जाधव यांनी ऑफिसवर झालेल्या दगडफेक संदर्भात तक्रार केली. भास्कर जाधव यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली. अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्याकडे तक्रार भास्कर जाधव यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Team India Playing XI: रोहित In झाल्यानंतर कोण होणार Out? कशी असेल टीम इंडियाची प्लेइंग ११?

Ramdas Athwale : महायुतीत मुख्यमंत्रिपदाबाबत काय चर्चा झाली? रामदास आठवले यांनी सांगितली Inside Story

Maharashtra News Live Updates: दिल्लीत मल्लिकार्जुन खर्गे यांच्या घरी शरद पवार यांची बैठक होण्याची शक्यता

Junnar Crime : शेतमालाची चोरी करण्यास विरोध; बाजार समितीत तरुणांकडून व्यापाऱ्यांवर जीवघेणा हल्ला

Chalisgaon Crime : गृहकर्जाची बँकेतून काढली एक लाख ९० हजारांची रोकड; चोरट्यानी संधी साधत लांबविली रोकड

SCROLL FOR NEXT