Uddhav Thackeray vs Eknath Shinde Saam TV
मुंबई/पुणे

Eknath Shinde vs Uddhav Thackeray: CM शिंदे-उद्धव ठाकरे कल्याणमध्ये आमने-सामने येणार? दोन्ही नेते एकाच दिवशी, एकाच शहरात

Vishal Gangurde

अभिजीत देशमुख, कल्याण

Eknath shinde vs Uddhav thackeay:

उद्धव ठाकरे 13 जानेवारी रोजी कल्याणमध्ये येणार आहेत. याच दिवशी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील कल्याणमध्ये येणार असल्याची माहिती शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील यांनी दिली आहे.

एकीकडे उद्धव ठाकरे कल्याण लोकसभा मतदारसंघात आढावा घेण्यासाठी येत आहेत. तर विविध विकास कामांच्या लोकार्पणासाठी मुख्यमंत्री कल्याणमध्ये येत आहेत. एकाच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे कल्याणमध्ये येत असल्याने या दिवशी दोन्ही गटांकडून शक्तिप्रदर्शन केले जाण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

दोन्ही नेते आमने-सामने येणार?

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 13 जानेवारी रोजी कल्याण मध्ये येणार असल्याची माहिती पक्षाचे कल्याण शहर प्रमुख रवी पाटील यांनी दिली आहे. कल्याण पश्चिमेत अग्निशमन इमारतीच्या लोकार्पण 10 इलेक्ट्रिक बसच्या लोकार्पण आणि इतर विकास कामांच्या लोकार्पणासाठी मुख्यमंत्री कल्याणमध्ये येणार असल्याची माहिती कल्याण शहर प्रमुख रवी पाटील यांनी दिली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

उद्धव ठाकरे कल्याण मतदारसंघाचा आढावा घेणार

दुसरीकडे शिवसेनेत फुट पडल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे कल्याणमध्ये येणार आहेत. 13 जानेवारी रोजी उद्धव ठाकरे कल्याण लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांचा मतदारसंघ असल्याने ठाकरे गटाकडून त्यांना आव्हान देण्यासाठी उमेदवार कोण असेल, यावर विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. उद्धव ठाकरे आढावा बैठकीत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना काय सूचना करताय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुख्यमंत्री येताहेत आता तरी स्वच्छता करा; शिवसेना शहरप्रमुखाचे आयुक्तांकडे मागणी

मुख्यमंत्री शिंदे १३ जानेवारीला येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शहरप्रमुख रवी पाटील यांनी आयुक्तांकडे शहर स्वच्छ करण्याची मागणी केली आहे. 'कल्याण पश्चिम येथील विविध ठिकाणी अस्वच्छता पसरली आहे. फुटपाथ मोकळे नाही काही लोकांनी रस्त्याच्या बाजूला अनाधिकृत टपऱ्या उभा केल्या आहेत, त्यावर कारवाई झाली पाहिजे, असे रवी पाटील म्हणाले.

'या संदर्भात वेळोवेळी महापालिका प्रशासनाकडे आम्ही तक्रार केली आहे. परंतु अधिकारी लक्ष देत नाही, आता या संदर्भात केडीएमसी आयुक्त इंदूराणी जाखड यांच्यासोबत बोलणं झालं आहे. सोमवारी शहरातील काही भागांच्या आयुक्तांसोबत पाहणी दौरा करणार आहेत. मुख्यमंत्री कल्याणमध्ये येण्याच्या आधी स्वच्छ झाला पाहिजे, अशी मागणी शहरप्रमुख रवी पाटील यांनी केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील वाद चव्हाट्यावर

Kili Paul Dance : किली पॉलने भोजपुरी गाण्यावर धरला ठेका, 'लॉलीपाप लागेलू'वर जबरदस्त डान्स; हुकस्टेपने वेधलं लक्ष

Shahajibapu Patil : उद्धव ठाकरे कधीच मुख्यमंत्री होणार नाहीत; काळ्या दगडावरची पांढरी रेघ, ५० खोक्यांवरून शहाजीबापू खवळले

Mrunal Thakur: मृणाल ठाकूरविषयी माहित नसलेल्या गोष्टी

Navratri Special Dish: नवरात्रीसाठी रोज काय बनवायचं हा प्रश्न पडलाय का?

SCROLL FOR NEXT