manoj jarnage  Saam TV
मुंबई/पुणे

Manoj Jarange News : मनोज जरांगेंची अट पूर्ण; CM एकनाथ शिंदे, अजित पवार आंतरवाली सराटीत जाणार

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रुपाली बडवे

Mumbai News :

जालन्यातील आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील मागील १६ दिवसांपासून उपोषण करत आहे. मराठा समाजाच्या आरक्षणांसाठी त्यांच हे आंदोलन सुरु आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी सरकारच्या विनंतीनंतर उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. मात्र उपोषण सोडण्यासाठी त्यांना काही अटी सरकारसमोर ठेवल्या आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांना उपोषणस्थळी यावं अशीही अट त्यांनी घातली होती. यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज मनोज जरांगे पाटली यांचे उपोषण सोडण्यासाठी संध्याकाळी ५ वाजता जाणार आहेत. (Latest Marathi News)

मराठ्यांना कुणबी दाखला मिळणं अशक्य?

मराठा समाजाच्या मागणीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. अभिलेख नोंदीतून ही माहिती समोर आली आहे. मराठ्यांना आरक्षण मिळावं, तसेच त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, यासाठी जालन्यातील अंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे.

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर मराठवाड्यातील १९६७ पर्यंतच्या ३४ लाख अभिलेखांचा अभ्यास करण्यात आला. यापैकी केवळ ४१६० अभिलेखांवर कुणबी नोंद (Kunbi Certificate) आढळली आहे. याचा अर्थ असा की, निजामकालीन वंशावळीच्या आधारे सरसकट मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ होणार नाही. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Governemnt Job: अन्न आणि औषध प्रशासनात नोकरीची सुवर्णसंधी; महिना १,१२,००० रुपये पगार; जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंचा डबल धमाका, महायुतीला 'दे धक्का',भाजप- राष्ट्रवादीचे २ बडे नेते शिवबंधन बांधणार; आज मातोश्रीवर पक्षप्रवेश

Viral Video: ना रोमान्स, ना कपल डान्स; दिल्ली मेट्रोत आता कुटाकुटी, viral video

Maharashtra Politics : गुहाटीवरून परतलेल्या ठाकरेंच्या शिल्लेदाराच्या मतदारसंघात काय घडतंय? वंचित'चं ठरलं, महायुतीत रस्सीखेच सुरूच

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी मिळणार? समोर आली मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT