CIDCO Housing Price Saam
मुंबई/पुणे

मोठी बातमी! सिडकोच्या घरांच्या किमती कमी होणार? मुख्यमंत्री महत्त्वाचा निर्णय घेणार

CIDCO Housing Price: सिडकोच्या घरांच्या किमती करण्याबाबत मुख्यमंत्री १५ दिवसांत बैठक घेणार. उपमुख्यमंत्र्यांकडून बैठक न घेतल्यामुळे आता मुख्यमंत्री अॅक्शन मोडवर.

Bhagyashree Kamble

  • सिडकोच्या घरांच्या किमती करण्याबाबत १५ दिवसांत बैठक.

  • मुख्यमंत्री अॅक्शन मोडवर.

  • नागरिकांची घरांच्या किंमती कमी करण्याबाबत मागणी.

नवी मुंबईतील सिडकोच्या घरांच्या भरमसाठ किमतीमुळे सर्वसामान्य नागरिकांनी ही घरं नाकारली आहे. याचा थेट फटका सिडकोला बसला आहे. दोन महिन्यांपासून या घरांच्या किमती कमी करण्यासाठी नागरिकांकडून मागणी होत आहे. याबाबत अद्याप बैठक झालेली नाही. सरकारकडून अद्याप निर्णय न घेण्यात आल्यामुळे नागरिकांनी आरक्षित केलेली घरं परत केली आहेत. सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्याबाबत लवकरच बैठक घेण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक व्हावी, अशी अपेक्षा होती. मात्र, त्यांच्याकडून बैठक न झाल्यानं नागरिकांमध्ये सध्या नाराजी आहे. नागरिकांनीही वारंवार घरांच्या वाढीव किमतीबाबत तक्रार केली होती.

यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: पुढाकार घेतला आहे. त्यांनी आपल्या भाषणात स्पष्ट आश्वासन दिलं की, 'पंधरा दिवसांच्या आत सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्याबाबतची बैठक आयोजित करण्यात येईल', असं फडणवीस म्हणाले. या बैठकीत नेमकं काय निर्णय घेण्यात येईल? हे पाहणं आता महत्वाचं ठरेल.

दरम्यान, मुख्यमंत्री भाषण करत असताना उपस्थित माथाडी कामगारांनी 'सिडकोच्या घरांच्या किमती कमी करा', अशा जोरदार घोषणा दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: या 8 गोष्टी चुकूनही कोणालाही सांगू नका, अन्यथा होईल तुमचंच मोठे नुकसान

'तुमच्या उरावर भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही'; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल

Eiffel Tower Lightning: आयफेल टॉवरवर वीज कोसळली, थरारक VIDEO होतोय व्हायरल

टिटवाळ्यात पाणीटंचाईचा कहर! पाणी आणायला गेलेल्या 3 चिमुकल्यांना भरधाव कारची धडक

Hair Care: केस गळती आणि डँड्रफ कमी करायचाय? मग केस धुण्याआधी लावा हा घरी तयार केलेला हेअर मास्क

SCROLL FOR NEXT