Devendra Fadnavis Saam tv
मुंबई/पुणे

मुंबई महापालिकेत श्रेय चोरणारी टोळी सक्रिय; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर निशाणा

Devendra Fadnavis News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्याच भाषणा ठाकरे बंधूंवर निशाणा साधला आहे. मुंबई महापालिकेत श्रेय चोरणारी टोळी सक्रिय आहे, असं म्हणत फडणवीसांनी ठाकरे बंधूंवर टीका केली आहे.

Vishal Gangurde

महायुतीकडून मुंंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात

पहिल्याच प्रचारसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर निशाणा

महापालिकेत श्रेय चोरणारी टोळी सक्रिय, मुख्यमंत्री फडणवीसांची टीका

मुंबईत महायुतीने महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. महायुतीच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत प्रचाराचा आज नारळ फोडला. मुंबईतील पहिल्या प्रचारसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर निशाणा साधला. मुंबई महापालिकेत श्रेय चोरणारी टोळी सक्रिय झाली आहे, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर टीका केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील मुद्दे

मुंबईकर जागा झाला आहे. कारण तो विकासाचा धागा झाला आहे. ही निवडणूक मुंबईकरांसाठी महत्वाची आहे. मला काही पत्रकार एकत्र आले, तुमचं काय होणार. आता तुम्ही कसं लढणार. मी म्हणालो, यांचं कँम्पेन बघितलं. आता मुंबईत श्रेय चोरणारी टोळी सक्रिय झाली आहे. या टोळीमध्ये अबोध बालके देखील आहेत. ते श्रेय चोरण्याचा प्रयत्न करत आहेत.

ते म्हणतात, सर्व आम्हीच केलंय. ते म्हणतात,कोस्टल रोड आम्हीच केलंय. मेट्रो देखील आम्हीच केल्याचं म्हणत आहे. पण अर्ध्या रात्री मुंबईकरांना विचारलं की, कोस्टल रोड आणि बीडीडी चाळीचा विकास कोणी केला. मेट्रो कोणामुळे झाली, अर्ध्या रात्री देखील मुंबईकर सांगतील की, हे महायुतीने केली आहे.

प्रत्येक कामात खोडा कोणी घातला, कोणी बाधा घातली, ते एकच नाव घेतील. ते म्हणजे उद्धव ठाकरे. मुंबईचा महापौर हा महायुतीचा होणार. मुंबईचा महापौर हा हिंदू आणि मराठीच होणार. वारीस पठाण बोलून गेले की, बुरख्यावाली महापौर होईल. पण मला समजलंच नाही की, भोंग्याचे सेल डाऊन झाले. सकाळचा भोंगा बोलेना, शब्दही निघेना. त्याचे उत्तर देण्यासाठी तयार नाहीत. त्यांना आम्हालाच त्यांना चार्ज करावं लागेल.

मुंबई फक्त हिंदू आणि मराठीच महापौर होईल. आमचं कुठल्याही धर्माशी वैर नाही. भारतात प्रत्येकाला आपला धर्म जपण्याचा आहे. आमचा विरोध वंदे भारत म्हणायला नकार देणाऱ्या ताकदीविरोधात आहे. आम्ही त्यांच्या विरोधात आहे. माहिमच्या दर्ग्यावर भारताचा झेंडा फडकण्यात येणार होता, त्यावेळी मी स्वत: मुख्यमंत्री म्हणून गेलो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: परभणीत उन्हाचा कहर, तापमानाने गाठला 45.2 अंशांचा उच्चांक

South Chutney Recipe : ना नारळ ना टोमॅटो; साऊथ इंडियन नाश्त्यासोबत स्वादिष्ट लागते 'ही' चटपटीत चटणी, बनवायला खूपच सोपी

Riteish - Raja Shivaji Collection : रितेश देशमुखची गगन भरारी! 'राजा शिवाजी'ची १०० कोटींच्या क्लबमध्ये दमदार एन्ट्री, लवकरच रचणार मोठा इतिहास

Maharashtra Heatwave : राज्याला उन्हाचा चटका, तापमान ४० शी पार; मान्सूनची स्थिती काय? वाचा हवामानाचा अंदाज

जिल्हा परिषद भरतीत महाघोटाळा? बनावट दिव्यांग प्रमाणपत्रावर मिळवली सरकारी नोकरी, महिलेला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

SCROLL FOR NEXT