devendra fadnavis news  Saam tv
मुंबई/पुणे

सर्वात मोठी बातमी! सातारा प्रकरणावरून मुख्यमंत्री फडणवीस नाराज; उपमुख्यमंत्री शिंदेंना दिला स्पष्ट इशारा, Inside Story समोर

devendra fadnavis news : सातारा प्रकरणावरून मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी या प्रकरणावरून उपमुख्यमंत्री शिंदेंना स्पष्ट इशारा दिल्याचे समोर आलं आहे.

Vishal Gangurde

सातारा प्रकरणावरून महायुतीत तणाव वाढल्याचे समोर येत आहे

सातारा राड्यावरून शिंदे गटाच्या आमदारांचं आंदोलन

फडणवीसांची शिंदेंकडे नाराजी स्पष्टपणे व्यक्त

गणेश कवडे, साम टीव्ही

सातारा प्रकरणावरून राज्यातील घडामोडींना वेग आला आहे. सातारा जिल्हापरिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीवरून झालेल्या राड्याचे पडसाद काल विधीमंडळात उमटले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उघड नाराजी व्यक्त केली होती. शिंदे गटाच्या आमदारांनी सभागृहाच्या पायऱ्यावर आंदोलन केलं. यावरून आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नाराजी व्यक्त केली.

सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीमुळे महायुतीत वादाची ठिणगी पडल्याचे उघड झालं. यावरून विधीमंडळात पडसाद उमटल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेची राजकीय खेळी आणि शंभूराज देसाईंच्या आरोपांवर तीव्र नाराजी व्यक्त केली.

भाजप सामंजस्याची भूमिका घेत असला तरी साताऱ्यासारखे प्रकार खपवून घेणार नाही, अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री फडणवीसांनी एकनाथ शिंदेंसमोर मांडली. सांगली प्रकरणावरूनही त्यांनी असहमती दर्शवल्याचे समोर आलं आहे.

साताऱ्यात नेमकं काय घडलं होतं?

सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीदरम्यान राडा झाला होता. भाजपकडे संख्याबळ नसताना त्यांचा अध्यक्ष ,उपाध्यक्ष झाल्याने हायव्होल्टेज ड्रामा झाला. यावेळी मंत्री शंभूराजे देसाई यांना दुखापत झाली होती. त्यानंतर पोलिसी बळाचा वापर आणि प्रशासनाला हाताशी धरून निवड झाल्याचा आरोप मंत्री शंभुराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांनी केला होता. त्यानंतर सातारा प्रकरणावरून मंत्री शंभूराज देसाई यांनी सोमवारी विधिमंडळातही आवाज उचलला. त्यानंतर मंत्री जयकुमार गोरे यांनी तातडीने प्रत्युत्तर दिल्याचेही पाहायला मिळाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT