Railway News Saam Tv
मुंबई/पुणे

Harbour Line Expansion : रेल्वे प्रवाशांना केंद्र सरकारकडून मोठं गिफ्ट, ट्रान्स- हार्बर मार्गावर २ नवीन स्थानके अन् १० लोकल फेऱ्या वाढणार

Harbour Local Railway News : नेरूळ–उरण आणि बेलापूर–उरण मार्गांवर अतिरिक्त लोकल फेऱ्यांना मंजुरी मिळाली आहे. तसेच तरघर व गव्हाण येथे नव्या रेल्वे स्थानकांचीही घोषणा करण्यात आली आहे. या निर्णयामुळे दैनंदिन प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Alisha Khedekar

  • नेरूळ–उरण व बेलापूर–उरण मार्गांवर एकूण १० लोकल फेऱ्यांची वाढ

  • तरघर व गव्हाण स्थानकांना केंद्र सरकारची मंजुरी

  • हार्बर मार्गावरील गर्दी कमी करण्याचा मुख्य उद्देश

  • प्रवाशांच्या दीर्घकाळापासूनच्या मागणीची पूर्तता

रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. कित्येक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या नेरूळ–उरण–नेरूळ आणि बेलापूर–उरण–बेलापूर या मार्गांवर अतिरिक्त लोकल फेऱ्या सुरू होणार आहेत. याशिवाय तारघर व गव्हाण याठिकाणी नव्या रेल्वे स्थानकास मंजुरी देखील मिळाली आहे. वाढत्या लोकल फेऱ्यांच्या निर्णयाने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

हार्बर मार्गावरील लोकलमधील गर्दी कमी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पंतप्रधानासह केंद्राकडे अतिरिक्त गाड्या आणि नव्या २ स्थानकांची कित्येक दिवसांपासून मागणी केली होती. या मागणीला केंद्राकडून हिरवा कंदील मिळाला आहे. त्यानुसार, नेरूळ–उरण–नेरूळ या मार्गावर ४ अतिरिक्त लोकल फेऱ्या आणि बेलापूर–उरण–बेलापूर मार्गावर ६ अतिरिक्त लोकल फेऱ्या सुरू होणार आहेत.

याशिवाय हार्बर मार्गावर तारघर व गव्हाण याठिकाणी नव्या रेल्वे स्थानकास मंजुरी देण्यात आली आहे.यामुळे उरण कॉरिडॉरवरील वेगाने विकसित होणाऱ्या निवासी आणि औद्योगिक क्षेत्रांमधील प्रवाशांना दिलासा मिळेल. देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वे मंत्रालयाकडून मिळालेले पत्र शेअर करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांचे आभार मानले.

पुढे फडणवीस म्हणाले की, या निर्णयामुळे दैनंदिन प्रवाशांना मोठा फायदा होईल आणि नवी मुंबई आणि आसपासच्या भागात राहणाऱ्या लोकांसाठी प्रवास सोपा होईल. मंजुरीमध्ये तरघर आणि गव्हाण स्थानकांवर थांबे देखील समाविष्ट आहेत, ज्या स्थानिक प्रवाशांची दीर्घकाळापासूनची मागणी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Actress Arrested: 'आमच्या कुटुंबाशी तिचा संबंध...'; सुनेच्या अटकेवर 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीची ठाम प्रतिक्रिया

Kitchen Hacks : फरशीवरील चिकट डाग कसे काढावे? वापरा हे सोपे घरगुती उपाय

Maharashtra Live News Update : नवी मुंबईत भाजप शिवसेना स्वबळावर लढणार

Pune Politics: पुण्यात मोठा राजकीय भूकंप, अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद वाढली; १० दिग्गज नेत्यांचा पक्षप्रवेश

Five Rajyog On 2026: 500 वर्षांनी या राशींचं नशीब फळफळणार; 5 राजयोग करणार सर्व इच्छा पूर्ण

SCROLL FOR NEXT