cleansing drainage work in navi mumbai will complete in week says mahapalika  Saam Digital
मुंबई/पुणे

Saam Impact: 'साम टीव्ही' च्या बातमीनंतर नवी मुंबई महापालिका प्रशासन ताळ्यावर, आठवडाभरात नालेसफाईचे काम पूर्ण हाेणार, Video

Navi Mumbai Drainage Cleanliness : साम टीव्हीच्या वृत्तानंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील महापालिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करत नालेसफाई झालेली नाही, कंत्राटदराला वाऱ्यावर सोडल्याचे नमूद केले.

Siddharth Latkar

- सिद्धेश म्हात्रे

नवी मुंबई येथील नाले सफाईच्या कामात दिरंगाई हाेत असल्याची बाब साम टीव्हीने समाेर आणल्यानंतर खडबडून जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने नालेसफाईच्या कामाची गती वाढवली आहे. महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांनी आठवड्याभरात काम पूर्ण होईल असे आश्वासन साम टीव्हीशी बाेलताना दिले.

नवी मुंबईत मान्सूनपूर्व कामे अतिशय धिम्या गतीने होत आहेत. महापालिकेने शहरातील 85 टक्के नाले आणि गटारांची साफसफाई केल्याचा दावा केला. मात्र प्रत्यक्षात मोठ्या नाल्यांमधील गाळ अद्यापही काढला गेला नसल्याचे चित्रं साम टीव्हीने समाेर आणले.

वाशी सेक्टर 17 येथील पाम बीच मार्गाला लागून असलेल्या नाल्यातील गाळ स्पष्ट दिसत असून महापालिकेने नालेसफाई करत गाळ काढल्याचा दावा खाेडून काढला.

दरम्यान साम टीव्हीच्या बातमीनंतर नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाला जाग आली. नवी मुंबईतील नालेसफाईच्या कामाची मनपा आयुक्त कैलास शिंदे यांनी पाहणी केली. आयुक्तांच्या पाहणी दौऱ्यामुळे नालेसफाईच्या कामांना गती मिळाली. शिंदे म्हणाले नवी मुंबईतील 96 नाल्यापैकी 77 नाल्यांची सफाई पूर्ण झाली आहे. उर्वरित 19 नाल्यांची सफाई पुढील आठवड्याभरात पूर्ण होईल.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोलापूर दौऱ्यावर असणाऱ्या मंत्री भरत गोगावले यांचा ताफा शेतकऱ्यांनी रोखला

Mumbai Local Block: मध्य रेल्वेवर २ दिवसांचा रात्रकालीन ब्लॉक; लोकलसह ट्रेनच्या वेळापत्रकात बदल, वाचा सविस्तर

Sakhi Gokhale: मन तुझं जलतरंग, लहरी तुझा साज...

Prabalgad Fort History: ट्रेकिंगसाठी खास! सह्याद्री पर्वतरांगेतील प्रबळगड किल्ल्याचे ऐतिहासिक वैशिष्ट्ये आणि इतिहास

अंगणाडी सेविकांना भाऊबीजेचं गिफ्ट! दिवाळीचा बोनस कधी मिळणार? आदिती तटकरेंनी थेट तारीख सांगितली

SCROLL FOR NEXT