SSC, HSC Result Saam TV
मुंबई/पुणे

SSC Result 2022: दहावीच्या निकालाची प्रतीक्षा संपली; उद्याच लागणार निकाल, असा पाहा

दहावीचा निकाल कधी लागणार याबाबत राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्वाची माहिती दिली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रुपाली बडवे -

मुंबई : राज्यभरातील इयत्ता दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दहावीचा निकाल कधी लागणार याबाबत परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांना देखील निकालाची प्रतीक्षा होती.

मात्र, त्यांची प्रतीक्षा आता संपुष्टात आली असून, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल (SSC Result) मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार, उद्या दिनांक १७ जून, २०२२ रोजी दु. १:०० वा.ऑनलाईन जाहीर होणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी आज ट्विटद्वारे दिली आहे.

दरम्यान, हा निकाल विद्यार्थाना कसा पाहता येणार आहे याबाबत महामंडळाने एक परिपत्रक जारी केलं आहे. त्यानुसार एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेचा, इयत्ता १० चा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार जाहीर करण्यात येत असून हे निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर शुक्रवार, दिनांक १७/०६/२०२२ रोजी दुपारी ०१.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे.

दहावी मार्च-एप्रिल २०२२ परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण खालील संकेतस्थळांवरून (वेबसाईटवरुन) उपलब्ध होणार आहेत शिवाय विद्यार्थ्यांना त्यांच्या निकालाची प्रिंट देखील घेता येणार आहे. मंडळाने जाहीर केलेल्या अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत.

SSC Result 2022: असा तपासा निकाल -

१. www.mahresult.nic.in

२. http://sscresult.mkcl.org

3. https://ssc.mahresults.org.in

परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्याथ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवरून उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रिंट देखील घेता येणार आहे. तसंच www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल. तसंच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होणार असल्याची माहिती देखील मंडळाने दिली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hruta Durgule Husband: अभिनेत्री हृता दुर्गुळेचा नवरा कोण?

महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात गूढ वाढलं, पोलिसांनंतर आता खासदारासह पीएवर गंभीर आरोप; भावाचा खुलासा

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये आशा वर्करवर ॲम्बुलन्स चालकाकडून लैंगिक छळ

Nashik Crime : संतापजनक; रुग्णवाहिकेत आशा वर्करसोबत गैरवर्तन, रात्री परतताना चालकाचे कृत्य

"RSS रजिस्टर आहे का?" सुजात आंबेडकरांचा थेट सवाल|VIDEO

SCROLL FOR NEXT