Clash between party workers of Shinde and Thackeray group at the memorial site of Balasaheb Thackeray Saam Tv
मुंबई/पुणे

Thackeray Group Vs Shinde Group: बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर राडा, शिंदे-ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने; शीतल म्हात्रे संतापल्या...

Balasaheb Thackeray Memorial Mumbai: बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर राडा, शिंदे-ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने

Satish Kengar

Clash Between Party Workers Of Shinde and Thackeray Group At The Memorial Site Of Balasaheb Thackeray:

एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईतील शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर शिंदे गट आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले आहेत. दोन्ही बाजूकडून घोषणाबाजी केली जात आहे. शेकडोच्या संख्येने दोन्ही गटाचे कार्यकर्ते येथे पोहोचले आहेत. काही वेळेपूर्वीच येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फुलाच्या पाकळ्या अर्पण करून बाळासाहेब ठाकरे यांना वंदन केलं होतं. यानंतरच येथे दोन्ही गटाचे कार्यकर्ते जमले आणि घोषणाबाजी करू लागले.

या घटनेचे काही व्हिडिओही समोर आले आहेत. यातील एका व्हिडिओमध्ये शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रेही दिसत आहेत. यात म्हात्रे खूपच आक्रमक दिसत असून त्या पोलिसांशी बोलताना दिसत आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांना अभिवाद केल्यानंतर ते येथून निघाले. त्यानंतर ठाकरे गटाचे नेते अनिल परब आणि अनिल देसाई पोहोचले. त्यांच्यासोबतच मोठ्या संख्येने ठाकरे गटाचे नेते येथे दाखल झाले. शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के आणि शीतल म्हात्रे हे देखील तिथं उपस्थित होते. त्यांच्यासोबतही शेकडो कार्यकर्ते येथे उपस्थित होते. या दोन्ही घाटाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात घोषणाबाजी केली. (Latest Marathi News)

पार्कातल्या या राड्यावर बोलताना शीतल म्हात्रे म्हणाल्या की, ''आम्ही शिंदे गट नाहीतर आम्ही शिवसेना आहोत, हे कोण आहेत? यांच्या पक्षाचं नाव काय? उद्या या ठिकाणी गोंधळ नको म्हणून मुख्यमंत्री शिंदे आज इथं बाळासाहेबांच्या दर्शनासाठी आले. पण यांनी आज इथं यायची गरजच काय होती? हे इतक्या मोठ्या संख्येनं इथं का आले?'' असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, मुंब्र्यामध्ये ठाकरे गटाची शाखा तोडल्यानंतर स्वतः उद्धव ठाकरे त्या ठिकाणी पोहोचले होते. मात्र त्यांना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला आणि त्यांना शाखेकडे न जाताच माघारी परतावं लागलं होतं. यानंतर आज मुख्यमंत्री शिंदे येथे आल्याने त्यांना विरोध म्हणून ठाकरे कार्यकर्ते येथे मोठ्या संख्येने आले होते, असं सांगितलं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Police Roles: राणी मुखर्जीपासून अजय देवगणपर्यंत, 'या' कलाकारांनी पडद्यावर साकारली पोलिसांची दमदार भूमिका

Skin Care: वयाच्या चाळीशीतही तरुण दिसायचं, तर घरच्या घरी करुन लावा ही पेस्ट, आठवड्याभरात दिसेल फरक

Maharashtra Live News Update: गणेश विसर्जन मिरवणुकीत महिला पत्रकाराचा विनयभंग करणारे अखेर अटकेत

Wednesday Horoscope : मेष राशीसाठी संकष्ठीला लाभ, या राशींच्या नव्या संकल्पना यशस्वी होणार

Janhvi Kapoor: नवरी नटली! जान्हवी कपूरचा नवा ब्रायडल लूक पाहिलात का?

SCROLL FOR NEXT