Clash In Bank Over 2000 Rs Note
Clash In Bank Over 2000 Rs Note saam tv
मुंबई/पुणे

Clash In Bank Over 2000 Rs Note : 2000 रुपयांची नोट बदलायला बँकेत गेला, संतप्त होत कर्मचाऱ्याने केली मारहाण

Priya More

Vasai News: आरबीआयने (RBI) 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बंद केल्या. या नोटा बँकांमधून बदलून घेण्यासाठी 30 सप्टेंबर्यंतचा कालावधी आरबीआयने दिला आहे. त्यामुळे ग्राहक मोठ्याप्रमाणात नोटा बदलतून घेण्यासाठी बँकांमध्ये (BANK) गर्दी करत आहेत. अशामध्ये या नोटा बदलण्यासाठी (2000 Rs Note) बँकेत गेलेल्या एका व्यक्तीला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहेत. वसईमध्ये ही घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 2000 रुपयांच्या नोटा बँकेतून बदलून घेण्यासाठी गेलेल्या ग्राहकाला माराहण करण्यात आली आहे. वसईतील एका बँकेच्या कर्मचाऱ्याने या ग्राहकाला माराहण केली आहे. नोटा बदलण्यासाठी गेलेल्या या ग्राहकाला कर्मचाऱ्याने आधार कार्ड मागितले होते. त्यानंतर या ग्राहक आणि बँक कर्मचाऱ्यामध्ये वाद झाला. या वादानंतर बॅक कर्मचाऱ्याने ग्राहकाला मारहाण करत त्यांचा चष्मा तोडल्याचा धक्कादायक प्रकार घडला.

याप्रकरणी वसईच्या माणिकपूर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पोलीस तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'निखिल जैन असे मारहाण झालेल्या ग्राहकाचे नाव आहे. त्यांचे वसईच्या माणिकपूर परिसरात जैन अँड जैन नावाचे दुकान आहे. या दुकानातील रोख रक्कम भरण्यासाठी सोमवारी दुपारी 12 च्या सुमारास ते माणिकपूर येथील एका नामांकित बँकेत गेले.

त्यांनी बँकेमध्ये भरण्यासाठी नेलेल्या या रकमेमध्ये काही दोन हजारांच्या नोटाही होत्या. ही रक्कम बँकेने बदलुन दिली. पण त्यानंतर बँकेने त्यांना सायंकाळी 5 च्या सुमारास बोलावून घेत आधार कार्डाची मागणी केली. या दरम्यान जैन यांनी आरबीआयचे काय नियम आहेत ते मला दाखवा, अशी मागणी बँक मॅनेजरकडे केली. त्यानंतर बँक कर्मचारी आणि जैन यांच्यात वाद झाला.

बँकेतील असिस्टंट मॅनेजर कार्तिक अय्‍यर यांनी जैन यांची रोख भरून घेऊ नका, अशी तंबी देत त्यांना धक्काबुक्की करत त्यांचा चष्मा तोडून टाकला, असा आरोप जैन यांनी केला आहे. या घटनेचा स्वत: जैन यांनी व्हिडिओ तयार केला. हा व्हिडिओ त्यांनी पोलिसांना पुरावा म्हणून दिला आहे. याप्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणावर बोलण्यास बँक कर्मचाऱ्यांनी नकार दिला. याप्रकरणी पोलिसांनी अदाखलपात्र तक्रार नोंदवली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये दोन ठिकाणी दहशतवादी हल्ले; पर्यटक आणि भाजपच्या नेत्यावर गोळीबार

Relationship Tips: लग्नाआधी भावी जीवन साथीदाराला विचारा 'हे' ३ प्रश्न; नाहीतर आयुष्यात येतील दुःख

Chandu Champion Trailer: कार्तिक आर्यनच्या चित्रपटाचा 'चॅम्पियन' ट्रेलर रिलीज

ED कडून थेट अटक करण्यावर आता बंधनं, PMLA वर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

RCB vs CSK IPL 2024 : बेंगळुरूची प्लेऑफमध्ये एन्ट्री पक्की; चेन्नई आयपीएलमधून बाहेर

SCROLL FOR NEXT