CJP Mumbai protest 75 year old participant suffers heart attack saam tv
मुंबई/पुणे

CJP च्या आंदोलनादरम्यान धक्कादायक घटना; आंदोलनकर्त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

75-Year-Old Participant Heart Attack Reported During CJP Protest : मुंबईतील शिवाजी पार्क येथे CJPच्या आंदोलनादरम्यान एका 75 वर्षीय आंदोलकाची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आलीय. त्यांना CPR देत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Bharat Jadhav

  • मुंबईतील शिवाजी पार्क येथे CJPकडून 2 ऑक्टोबरला आंदोलन पुकारण्यात आले आहे.

  • आंदोलनादरम्यान 75 वर्षीय गोपी पिल्लई यांची प्रकृती बिघडल्याची माहिती

  • मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे.

सुरज मसूरकर

दिल्लीनंतर आता महाराष्ट्राच्या राजधानीत कॉक्रोच जनता पार्टीचं (CJP) आंदोलन सुरू आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत असून या आंदोलनासाठी मोठ्या प्रमाणात तरुणांनी गर्दी केलीय. आज महात्मा गांधींच्या जयंतीदिनीच सीजेपीने मुंबईतील शिवाजी पार्कवर आंदोलन पुकारले आहे. मात्र याचदरम्यान एक धक्कादायक घटना घडलीय. एका आंदोलककर्त्याला हृदयविकाराचा झटका आला असून त्याला सीपीआर देत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत. दरम्यान या आंदोलकाचा मृत्यू झाल्याची माहिती हाती आलीय.

गोपी पिल्लई असं या आंदोलकांचे नाव असून ते ७५ वर्षाचे आहेत. ते केरळवरून सीजीपेच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आले होते.

बॉलिवूड कलाकारांकडून सीजेपी आंदोलनाचं कौतुक

अभिनेत्री शर्लिन चोपडाने देखील सीजेपीच्या आंदोलनात सहभागी होत पाठिंबा दर्शवलाय. तर ज्येष्ठ अभिनेते नसरुद्दीन शाह यांनीही सहभागी होत अभिजीत दिपकेचं कौतुक केलंय. कॉक्रोच जनता पक्षाकडून करण्यात येणाऱ्या आंदोलनात तरुणांचा मोठा सहभाग दिसत आहे. महात्मा गांधी यांच्या जयंतीचं औचत्य साधत तर दादर येथील शिवाजी पार्क जवळ CJP कडून आंदोलन केले जात आहे. या आंदोलनाला तरुणाई येऊ लागली आहे.

पंतप्रधान मोदींचा प्राण म्हणजे EVM

आंदोलनात सहभागी झालेल्या ज्येष्ठ नागरिकाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि EVMवर संताप व्यक्त केला. पंतप्रधान मोदींचा प्राण म्हणजे EVM, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली. निवडणूक प्रक्रियेबाबत आपल्या मनातील प्रश्नही त्यांनी यावेळी मांडले.

पंतप्रधानांना कुठलं कुटुंब नाही, देशाचं वाटोळं करणार"

आंदोलनात सहभागी झालेल्या एका ज्येष्ठ नागरिकाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली. पंतप्रधानांना कुठलं कुटुंब नाही, म्हणजे ते देशाचं वाटोळं करणार, असं मत त्यांनी व्यक्त केलं. त्यांच्या या वक्तव्याचीही आंदोलनस्थळी चर्चा झाली.

Gen Z सोबत ज्येष्ठ नागरिकही आंदोलनात

CJPच्या आंदोलनात मोठ्या संख्येने Gen Z तरुण सहभागी झाले आहेत. त्यांच्यासोबत ज्येष्ठ नागरिकांनीही उपस्थिती लावत निवडणूक प्रक्रियेबाबतच्या आपल्या व्यथा मांडल्या. त्यामुळे शिवाजी पार्कातील आंदोलनात तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांचा एकत्रित सहभाग पाहायला मिळाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Fort : महाराष्ट्रातील 'हा' किल्ला सतरंगी मातीमुळे प्रसिद्ध, पठारावर दिसतो निसर्गाचा चमत्कार

Surya Gochar 2026: नवरात्रीत 5 राशींच्या आयुष्यात मोठा ट्विस्ट! काम-धंद्यात अडचणी, प्रेमातही वाढणार तणाव

CNG bike: CNG बाईकची रेंज किती? 2 किलो CNGमध्ये जाणून घ्या किती किमी धावते?

Maharashtra News Live Update: सिप्ला फार्माच्या पुण्यातील गोदामाचे औषध विक्री परवाने रद्द; FDA ची कारवाई

पोलीस दलात पुन्हा मोठा फेरबदल; 5 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे नियुक्ती?

SCROLL FOR NEXT