CJP Abhijeet Dipke Delhi Protest PM Narendra Modi News AI image
मुंबई/पुणे

Abhijeet Dipke : "नरेंद्र मोदींना युवकांची भीती वाटते तर मग खुर्चीवर..."; दीपकेंचा संतप्त प्रतिक्रिया, राजकीय वर्तुळात खळबळ

CJP Abhijeet Dipke Delhi Jantarmantar Protest Update News : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीत आज अभिजित दिपके आंदोलन करणार आहेत. CJP संस्थापक अभिजित दिपके यांचा मोदी सरकारवर निशाणा.

Alisha Khedekar

  • मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी CJP चे आज आंदोलन

  • दिल्लीतील राजकीय वातावरण तापले

  • पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारली

  • राजधानीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात

CJP Abhjeet Dipke Delhi Protest Latest Update News मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी देशातील राजकीय वातावरण तापले आहे. या मागणीसाठी विरोधी पक्षांकडून दिल्लीत आंदोलन सुरू आहे. दरम्यान, आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारलेली असतानाही CJP चे संस्थापक अभिजित दिपके यांनी आज दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलनाची हाक दिली असून ते मुंबई विमान तळावरून दिल्लीच्या दिशेने रवाना झाले आहेत. यापूर्वी त्यांनी पंतप्रधान मोदीं घाबरले असल्याचे म्हटले. आता या आंदोलनाला कोणते वळण मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जंतरमंतरवरील आंदोलनामुळे राजधानीत कडेकोट सुरक्षा

मिळालेल्या माहितीनुसार, जंतरमंतर येथे आंदोलनासाठी मोठ्या प्रमाणावर सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. आतापर्यंत सुमारे २०० आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील काही भागांमध्ये निर्बंध लागू करण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे. या आंदोलनासाठी अभिजित दिपके आज सकाळी 7च्या सुमारास मुंबई विमानतळावरून दिल्लीकडे रवाना झाले. त्यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे आणि आंदोलनाच्या घोषणेमुळे राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान मोदींवर अभिजित दिपके यांचा निशाणा

मुंबई विमानतळावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अभिजित दिपके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. सरकार आंदोलकांना घाबरले असल्याचा आरोप त्यांनी केला. 'नरेंद्र मोदी घाबरले आहेत. म्हणून त्यांनी रेल्वे, मेट्रो आणि रस्ते सर्व बंद करून टाकले आहेत. जर नरेंद्र मोदींना या देशातील युवकांची आणि जनतेची एवढी भीती वाटत असेल, तर ते पंतप्रधानांच्या खुर्चीवर कशाला बसले आहेत?' असा संतप्त सवाल अभिजित दिपके यांनी उपस्थित केल्याचे सांगण्यात येत आहे.

राजकीय वातावरण तापले

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून विरोधी पक्षांनी दिल्लीत आंदोलन सुरू आहे. गेल्या चार दिवसांपासून विरोधी पक्षांचे नेते दिल्लीत ठाण मांडून आहे. यापूर्वी माजी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी CJP ने जंतरमंतर येथे आंदोलन केले होते आणि त्यानंतर राजीनामा मिळाल्याने संघटनेला यश मिळाले. आता ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान, आंदोलनाला परवानगी नाकारल्याच्या पार्श्वभूमीवर अभिजित दिपके दिल्लीमध्ये पोहोचल्यानंतर नेमकी काय भूमिका घेतात, तसेच आंदोलनाला कोणते नवे वळण मिळते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जंतर-मंतरवर सीजीपीचं आंदोलन, दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड

Cold Water : सकाळी उठताच थंड पाणी पिताय? सवय पडेल महागात, ५ गंभीर दुष्परिणाम वाचून हैराण व्हाल

भाजपला मोठा झटका! नागपूरमधील बड्या नेत्याचा थेट राजीनामा; पक्ष सोडताना सांगितले मोठे कारण

Diwali Holidays : दिवाळीच्या सुट्टीत मुलांना कसं ठेवाल व्यस्त? जाणून घ्या ६ भन्नाट उपाय

Maharashtra Weather : ऑक्टोबर हिटचा भयानक प्रकोप! कोकणात उष्णतेचा इशारा; तर 'या' जिल्ह्यांत धो-धो पावसाचा हायअलर्ट

SCROLL FOR NEXT