कृष्णप्रकाश यांची बदली थांबवण्यासाठी नागरिकांची स्वाक्षरी मोहीम  SaamTvNews
मुंबई/पुणे

कृष्णप्रकाश यांची बदली थांबवण्यासाठी नागरिकांची स्वाक्षरी मोहीम

राज्य सरकारने पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांची बेकायदेशीररित्या झालेली बदली तात्काळ थांबवावी अशी मागणी जोर धरत आहे.

गोपाल मोटघरे

पिंपरी चिंचवड : 'आयर्न मॅन' अशी ओळख असलेले पिंपरी-चिंचवडचे (Pimpri-Chinchwad) पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांची बेकायेशीररित्या झालेली बदली तात्काळ थांबवण्यात यावी, या मागणीसाठी पिंपरी चिंचवडकरानी स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ एका मोठ्या बोर्डवर स्वाक्षऱ्या करून पिंपरी चिंचवडकरांनी पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश (Krishna Prakash) यांच्या झालेल्या बदलीला (Transfer) आपला विरोध दर्शविला आहे.

हे देखील पहा :

कृष्णप्रकाश पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त असताना शहरातील गुन्हेगारीला मोठ्या प्रमाणात आळा बसला होता. तसेच पिंपरी चिंचवड शहरातील सर्व अवैध धंदे जवळपास बंद होते. त्यामुळे पिंपरी चिंचवडकर शहरात स्वतःला सुरक्षित समजायचे. मात्र, शहरातील काही राजकीय पुढाऱ्यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता महाविकास आघाडी (MVA Government) सरकारवर दबाव टाकून पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांची बदली केल्याचा आरोप नागरिकांनी यावेळी केला आहे. राज्य सरकारने पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांची बेकायदेशीररित्या झालेली बदली तात्काळ थांबवावी अशी मागणी जोर धरत आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

DA Hike : कर्मचाऱ्यांची दिवाळीत चांदी! पगार वाढणार, 'या' राज्यात DA मध्ये थेट 8% वाढ

Gold Rate Today: गणेशोत्सवात सोन्याचे दर पुन्हा घरसले, आज सोनं खरेदीची सुवर्णसंधी; 18k- 22k आणि 24k चे दर किती?

Sonam Maskar: कोल्हापूरच्या लेकीचा देशासाठी ‘अचूक निशाणा’; सोनमने आशियाई नेमबाजीत पटकावलं रौप्यपदक, वडिलांच्या संघर्षाचंही झालं चीज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, या आठवड्यात खात्यात जमा होणार ₹1500

Maharashtra News Live Update: जालनाच्या अंबडमध्ये दुकानाला भीषण आग, 4 ते 5 दुकानात जळून खाक

SCROLL FOR NEXT