palghar, palghar manor highway, Rasta Roko Andolan saam tv
मुंबई/पुणे

Palghar Manor Highway : पालघर मनाेर राज्य मार्गावर ग्रामस्थांचा रास्ता राेकाे, दाेन तास वाहतूक खाेळंबली

Rasta Roko Andolan : आंदाेलनावेळी पाेलिसांनी चाेख बंदाेबस्त ठेवला हाेता.

रुपेश पाटील

Palghar News : चांगला रस्ता मिळावा यासाठी स्थानिक नागरिकांनी आज (मंगळवार) पालघर मनोर राज्य मार्गावर मासवण येथे रास्ता रोकाे आंदाेलन केले. प्रशासनाने रस्त्याबाबत सकारात्मक दर्शविल्यानंतर नागरिकांनी रास्ता राेकाे आंदाेलन मागे घेतले. तब्बल दोन तास झालेल्या रास्ता राेकाे आंदाेलनामुळे वाहनधारकांची मात्र माेठी गैरसाेय झाली. (Maharashtra News)

पालघर मधील मासवन - काटाळे- नागझरी या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे येथील रुग्ण , विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. पाच वर्षांपूर्वी पाच कोटी रुपये निधी खर्च करून तयार केलेल्या रस्त्याची सध्या चाळण झाली असून या विरोधात आक्रमक झालेल्या स्थानिक नागरिकांनी पालघर मनोर या राज्य मार्गावर मासवण येथे तब्बल दोन तास रास्ता रोको केला.

या रास्ता रोकोत विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतला. रास्ता रोकोमुळे पालघर मनोर मार्गावरील वाहतुक तब्बल दोन तास ठप्प झाली होती. या आंदोलनामुळे पालघर मनोर या राज्यमार्गावर चार पेक्षाही अधिक किलोमीटरच्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.

प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर हा रास्ता रोको मागे घेण्यात आला मात्र दिलेल्या वेळेत हे काम पूर्ण न केल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा आंदोलनकर्त्यां स्थानिक नागरिकांकडून देण्यात आला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : काल एक गद्दार बोलला जय गुजरात. किती लाचारी. - उद्धव ठाकरेंचा शिंदेंना जोरदार टोला

Spiritual Shells: पैशाचा पाऊस पाडणारी कौरीची शेल कशी तयार होते? याचे महत्त्व काय आहे?

Dhule Tourism : वीकेंडसाठी धुळे परफेक्ट लोकेशन, 'ही' ३ ठिकाणं पाहताच आठवड्याचा थकवा जाईल पळून

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Metro In Dino Cast Fees: रोमँटिक म्युझिकल ड्रामा 'मेट्रो इन डिनो' चित्रपटातील कलाकारांचे मानधन किती?

SCROLL FOR NEXT