Crime News Saam DIGITAL
मुंबई/पुणे

Mumbai Latest News : मुंबईत CISF जवानाची आत्महत्या?, AK47 ने स्वतःवर झाडली गोळी, पोलीस तपास सुरु

CISF Jawan Killed himself in Mumbai : मुकेश खोडा भाई खेतरिया असं ४० वर्षीय जवानाचं नाव आहे. मृत जवान गुजरातमधील अमरेली जिल्ह्यातील रहिवासी होता.

सूरज सावंत

Mumbai News :

मुंबईतील बीकेसी परिसरात असलेल्या जिओ गार्डनजवळ CISF जवानाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली असल्याचा संशय आहे. मुकेश खोडा भाई खेतरिया असं ४० वर्षीय जवानाचं नाव आहे. मृत जवान गुजरातमधील अमरेली जिल्ह्यातील रहिवासी होता. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मुकेश यांनी सोबत असलेल्या एके ४७ रायफलने स्वतःवर गोळी झाडली. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना १६ डिसेंबर रोजी घडली. मुकेश यांची ड्युटी जिओ गार्डनच्या गेट क्रमांक 5 वर होती. तिथेच कर्तव्यावर असताना मुकेश यांनी आत्महत्या केली. (Latest Marathi News)

मृत्यूनंतर शीघ्रकृती दल आणि बीकेसी पोलिस घटनास्थळ दाखल झाले होते. त्यांनी मुकेश यांना शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात नेले.मात्र डॉक्टरांनी मुकेश यांना मृत घोषित केले. पोलिसांनी मुकेशचे वडील खोडा भाई यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली आहे.

याप्रकरणी शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून २९ काडतूसे जप्त केली आहेत. याप्रकरणी बीकेसी पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गोळी गळ्याकडून शरीरात शिरली. त्यामुळे गोळी मारली की अपघाताने लागली, याबाबत तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Final Results : महाराष्ट्र कुणाचा? विधानसभा निवडणूक निकालाचे सविस्तर अपडेट्स एका क्लिकवर

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

SCROLL FOR NEXT