Maharashtra Guidelines: राज्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे सुरु करण्याचा मुहूर्त ठरला Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Guidelines: राज्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे सुरु करण्याचा मुहूर्त ठरला

राज्यात चित्रपटगृह आणि नाट्यगृह उघडण्यास तसेच इतर सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : राज्यात चित्रपटगृह आणि नाट्यगृह उघडण्यास तसेच इतर सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार राज्यात चित्रपटगृह, नाट्यगृह येत्या २२ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठीची नियमावली राज्य सरकारच्या पर्यटन आणि सांस्कृतिक विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे.

हे देखील पहा-

मुख्य म्हणजे, केंटन्मेंट झोन व्यतिरिक्त अन्य ठिकाणीच चित्रपटगृह आणि नाट्यगृहांना परवानगी देण्यात आली आहे. राज्यात कोरोनाची पकड सैल होऊ लागल्यामुळे ब्रेक द चेन अंतर्गत चित्रपटगृह आणि नाट्यगृहांना परवानगी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २५ सप्टेंबर दिवशीच्या बैठकीत घेतला होता. टास्क फोर्सशी चर्चा करून, हा निर्णय घेण्यात आला होता. अखेर यासंदर्भाची मोठी घोषणा राज्य सरकार कडून करण्यात आली आहे. यासाठी २२ ऑक्टोबरचा मुहूर्त निवडण्यात आला आहे. दरम्यान, यासाठी नियमांची चौकट घालून देण्यात आली असून नियमांचे पालन न करणाऱ्यांविराधोत नियमानुसार कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

- जिल्हाधिकाऱ्यांशी विचारविनिमय करून निर्णय घ्यावा.

- कलाकार, कर्मचारी वृंद यांनी नियमितपणे तपासणी करावी.

- मास्क, सॅनिटायजरचा करणे आवश्यक.

- प्रेक्षकांना कलाकारांच्या कक्षेत भेटण्यास मज्जाव.

- केशभूषा आणि रंगभूषा करणाऱ्यांनी पीपीई किटस परिधान करणे गरजेचे.

- आरोग्यसेतू अ‍ॅप बंधनकारक.

- कलाकारांचे आणि प्रेक्षकांचे लसीकरण पूर्ण असणे आवश्यक.

- ५० टक्क्यांपेक्षा अधिक क्षमतेचा वापर करता येणार नाही.

- आसन व्यवस्थेमध्ये सुरक्षित अंतर राखणे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Liver Health: हे '४' पेय करतात यकृतावर गंभीर परिणाम ; तुम्हीही करता का या पेयांचे सेवन, वेळीच व्हा सावध

Maharashtra News Live Updates: गुजरातच्या पोरबंदरवरून मोठा अमली पदार्थांचा साठा जप्त

Maharashtra Politics : भाजपला विनंती, उद्धव ठाकरे म्हणाले मी बोलणी करायला तयार

Kitchen tips: हात खराब न करता चपातीचं पीठ कसं भिजवाल? पाहा एक सोपा देसी जुगाड

Ram-Leela Movie: रामलीला चित्रपटासाठी दीपिका पदुकोण नव्हती पहिली पसंती; तर या प्रसिद्ध अभिनेत्रीला  करण्यात आला होता रोल ऑफर...

SCROLL FOR NEXT