Pune Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Pune: 'त्या' मुलाच्या खुनाचा उलगडा; लैंगिक अत्याचार करुन हत्या केल्याचं उघड

खून झालेला 16 वर्षीय मुलगा कोथरुडमधील रहिवासी आहे.

अश्विनी जाधव - केदारी

पुणे: कोथरुड अल्पवयीन मूकबधिर मुलाच्या खुनाचा उलगडा झाला आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. लैंगिक अत्याचार करुन खुन केल्याचे उघड झाले आहे. पिंटू गौतम (वय 26, रा. महातोबा नगर, कोथरुड, मूळ. रा. बनारस, उत्तर प्रदेश) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. कोथरुडमधील (Pune-Kothrud) एकलव्य पॉलिटेक्निक कॉलेज मैदानाजवळ एका 16 वर्षीच्या मुलाचा खून करून मृतदेह पोत्यात बांधून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी रात्री घडला होता. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती.

खून झालेला 16 वर्षीय मुलगा कोथरुडमधील रहिवासी आहे. खाऊचे आमिष दाखवून त्याला बाहेर नेले आणि खून केला आहे. या घटनेची माहिती मिळताच कोथरुड पोलिसांनी (Pune Police) घटनास्थळी धाव घेतली होती. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर, मृतदेह शव विच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला होता.

दरम्यान एकलव्य कॉलेज मैदानाजवळ रात्रीच्या वेळेस लहान मुले खेळत होती. त्यांना पोत्यात काहीतरी बांधून ठेवलेले आढळून आले. पोते उघउून पाहिल्यावर त्यांना त्यात मृतदेह आढळून आला. त्यांनी आसपासच्या लोकांना सांगितले. तेथून ती बातमी पोलिसांना मिळाली. मृत मुलगा विशेष असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याचे आई वडील मजुरी करतात. मुलाच्या अंगावर एकही कपडा नव्हता. म्हणून मुलावरती अत्याचारा झाल्याची शंका व्यक्त केली जात होती. आता ते स्पष्ट झाले आहे की त्याचा खून अत्याचार करुन केला आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: टेम्पो रिव्हर्स घ्यायला गेला अन् पाण्यात उलटला, आगरदांडा जेट्टीवरचा व्हिडीओ व्हायरल!

Health Tips: कफ काही केल्या बरा होत नाही करा 'हे' उपाय

Acharya Chanakya: दिवसाची सुरुवात चांगली करण्यासाठी आचार्य चाणाक्यांचे 'हे' नियम पाळा

Rahul Gandhi : नागपुरात येऊन राहुल गांधींचं आरएसएसला आव्हान, संविधान सन्मान संमेलनात हल्लाबोल, काय म्हणाले?

Stroke: चेहरा तिरकस होणं, तोल जाणं...; स्ट्रोकची लक्षणं तुम्हाला माहितीये का? तज्ज्ञांनी दिली संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT