Lonavala News  Saam Tv
मुंबई/पुणे

COVID-19 Norms : पर्यटकांनो सावधान! लोणावळ्यात नवीन वर्षाचे स्वागत करायला येत असाल, तर ही बातमी वाचाच

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोणावळ्यात येणाऱ्या पर्यटकांना लोणावळा नगरपरिषदेच्या कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

दिलीप कांबळे

Lonavala News : चीनमध्ये कोरोनाने धुमाकूळ घातल्यामुळे भारताने त्याची धास्ती घेतली आहे. कोरोनामुळे केंद्र आणि राज्य सरकार अलर्ट मोडवर आहे. देशातही सार्वजनिक ठिकाणी मास्क घालण्याचं आवाहन केंद्र सरकारने केले आहे. याच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोणावळ्यात येणाऱ्या पर्यटकांना लोणावळा नगरपरिषदेच्या कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. (Latest Marathi News)

पर्यटननगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोणावळ्यात नवीन वर्षाचे स्वागत करायला येत असतात. तसेच ख्रिसमस साजरा करण्यासही पर्यटक येतात. मात्र, कोरोनाचे रुग्ण आढळू लागले आहेत. कोरोनासाथीच्या पार्श्वभूमीवर लोणावळा नगरपरिषद खबरदारी घेतली आहे.

लोणावळा नगरपरिषदेने पर्यटकांना मास्क, सॅनिटाईज आणि सोशल डिस्टनसिंग राखण्याचं आवाहन केले आहे. कोरोना परत येत आहे, या पार्श्वभूमीवर लोणावळा नगरपरिषदच्या वतीने आवाहन करण्यात आलं आहे. नवीन वर्षाचे स्वागत करायला राज्याच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक लोणावळ्यात येत असतात. पर्यटकांनो सावधान कोरोना परत येत आहे, त्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा,असे आवाहन केले जात आहे.

दरम्यान, हॉटेल, लॉजिंग, आणि रिसॉर्ट मालकांना या उपाययोजना राबविण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. याबाबत लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंडित पाटील यांनी आवाहन केलं आहे. पर्यटकांनो लोणावळ्यात याल तर कोरोनाचे नियम पाळा, असेही आवाहन पंडित पाटील यांनी केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

School News: पालकांची दिशाभूल करणाऱ्या शाळांना चाप बसणार; शिक्षण विभागाने घेतला मोठा निर्णय

Mumbai : मुंबईकरांना पाणीटंचाईची झळ बसणार? पाणीपुरवठा करणाऱ्या ७ धरणात किती टक्के पाणीसाठा उरलाय? माहिती समोर

Rasam Rice Recipe: घरच्या घरी टेस्टी साऊथ इंडियन स्टाईल रसम राईस नक्की बनवा, वाचा सोपी रेसिपी

Raigad Fort : शिवरायांच्या स्वराज्याच्या गौरवशाली इतिहासाचा साक्षीदार, 'रायगड'बद्दल 'या' गोष्टी तुम्हाला माहितेय का?

Maharashtra News Live Update: मेळघाटातील भुमकाबाबा मंदिर अखेर दर्शनासाठी खुले

SCROLL FOR NEXT