Corona Task Force Meeting, Corona News Updates Saam Tv
मुंबई/पुणे

कोरोनाने टेन्शन वाढवलं! टास्क फोर्सची बोलावली बैठक; काय होणार निर्णय

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक

मुंबई: राज्यात कोरोना (Corona) रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. वाढत्या रुग्णांची राज्य शासननाने गंभीर दखल घेतली आहे. आज सायंकाळी ६ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या संदर्भात कोविड टास्क फोर्सची बैठक बोलवली आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोनाचे रुग्ण वाढले तर मास्क (Mask) बंधनकारक करण्याचे सूतोवाच केले होते. त्यामुळे आजच्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय होणार असल्याचे बोलले जात आहे. (Corona News Updates)

गेल्या दोन दिवसांपासून राज्यात कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढत आहेत. मुंबई शहरात रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता पुन्हा कारानाचे निर्बंध लावले जातील अशी शक्यता वर्तवली जात आहे. फक्त मुंबई विभागातच ९०० च्या वर रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी कोविड टास्क फोर्सची बैठक बोलवली आहे.

महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक

काही दिवसापासून कोरोना (Corona) रुग्णात घट झाली होती. आता पुन्हा महाराष्ट्रात कोरोनाने डोक वर काढलं आहे. राज्यात बुधवार १ जून रोजी, १,०८१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर सक्रीय रुग्णांची संख्या ४,०३२ वर पोहोचली आहे. दिवसभरात ५२४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून, रुग्णांची संख्या ७७,३६,२७५ झाली आहे. राज्यातील बरे होण्याचा दर ९८.०७% आहे. राज्यातील मृत्यूचे प्रमाण १.८७% आहे.

आजपर्यंत ८,०९,५१,३६० नमुन्यांपैकी ७८,८८,१६७ चाचणी पॉझिटिव्ह आले आहेत. एका मुंबई शहरात आज एका दिवसात ७३९ नव्या रुग्णांची नोंद झाली आहेत. यातील २९ रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आलं असून ११ रुग्ण अत्यवस्थ आहेत.(Corona Cases In Maharashtra)

राज्यातील रुग्णांची आकडेवारी

मुंबई विभागात- ठाणे, नवी मुंबई, उल्हासनगर, भिवंडी निजामपूर, मीरा भाईंदर, पालघर, वसई विरार, रायगड, पनवेल या शहरांचा समावेश आहे. या विभागात ९६२ नव्या रुग्णांची (Corona) नोंद झाली आहे.

नाशिक विभागात - यामध्ये नाशिक, नाशिक एमसी, मालेगाव एमसी, अहमदनगर, अहमदनगर एमसी, धुळे, धुळे एमसी, जळगाव, जळगाव एमसी, नंदुरबार यांचा समावेश आहे, या विभागात ७ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

पुणे विभागात- यात पुणे, पीएमसी, पीसीएमसी, सोलापूर, सोलापूर एमसी, सातारा यांचा समावेश आहे. या विभागात ८८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

कोल्हापूर विभागात- कोल्हापूर, कोल्हापूर एमसी, सांगली, सांगली एमसी, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांचा समावेश होतो, या विभागात आज ४ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.(Corona Latest News)

औरंगाबाद विभागात- औरंगाबाद, औरंगाबाद एमसी, जालना, हिंगोली, परभणी, परभणी एमसी या जिल्ह्यांचा समावेश होतो, या विभागात २ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

लातूर विभागात- लातूर, लातूर एमसी, उस्मानाबाद, बीड, नांदेड, नांदेड एमसी, या जिल्ह्यांचा समावेश होतो, या विभागात नव्या १ रुग्णाची नोंद झाली आहे.

अकोला विभागात- अकोला, अकोला एमसी, अमरावती, अमरावती एमसी, यवतमाळ, बुलडाणा, वाशिम या जिल्ह्यांचा समावेश आहे, या विभागात २ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

नागपूर विभागात- नागपूर, नागपूर एमसी, वर्धा, भंडारा, गोंदीया, चंद्रपूर, चंद्रपूर एमसी, गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश होतो, या विभागात १५ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. Corona Latest News)

Edited By- Santosh Kanmuse

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nitesh Rane Controversial Statement: नितेश राणेंवरून महायुतीत वाद, अजित पवार गटाने देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीत केली मोठी मागणी

Thane Crime Story : एक खून, ना CCTV, ना ठोस पुरावे; अवघे दोन क्ल्यू अन् उकललं त्या हत्येचं गूढ

Nashik Crime : विहिरीत कासव पाहायला सांगितलं, नंतर ३ शाळकरी विद्यार्थ्यांना ढकलून दिलं; नाशिकमधील धक्कादायक प्रकार

Yogita Chavan: 'क्या खूब लगती हो...', सोज्वळ अंतराचा कातिलाना अंदाज

IND vs BAN: सिराज भडकला ना राव! रोहित अन् रिषभला मागावी लागली माफी; नेमकं काय घडलं?- VIDEO

SCROLL FOR NEXT