सुशांत सावंत -
मुंबई : राज्यात राज्यसभेच्या सहाव्या जागेवरुन रस्सीखेच सुरु असतानाच आता भाजप विधान परिषदेची (Legislative Council) पाचवी जागा लढवण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, राज्यसभेसाठी (RajyaSabha) महाविकास आघाडीने दिलेला चौथा उमेदवार मागे घेतला, तर भाजप (BJP) विधान परिषदेसाठी चारच उमेदवार देणार असल्याचं देखील समजतं आहे.
त्यामुळे राज्यसभेच्या बदल्यात विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं आहे. संख्याबळानुसार विधान परिषदेत भाजपचे चार उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. त्यामुळे आता जर राज्यसभेचा चौथा उमेदवार महाविकास आघाडीने मागे घेतला नाही तर भाजप विधान परिषदेसाठी पाचवा उमेदवारही देणार आहे. जर भाजपने पाचवा उमेदवार दिला तर विधान परिषद निवडणुक अटीतटीची होणार हे मात्र नक्की.
कसं आहे संख्याबळ -
भाजप आणि मित्रपक्ष मिळून सध्या ११३ संख्याबळ होत असल्यामुळे भाजपच्या चार जागा सहज निवडून येऊ शकतात. विधान परिषदेवर निवडणूक यायचे असेल तर एका उमेदवाराला २७ मतांची आवश्यकता असते. तसंच राष्ट्रवादीकडे ५४, शिवसेना ५६ आणि काँग्रेसचे ४५ आमदार आहेत. या संख्याबळानुसार विधान परिषद निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादीचे प्रत्येकी २ उमेदवार निवडून येतील. काँग्रेसचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो.
दरम्यान, विधान परिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीबाबतची प्रक्रिया आज २ जूनपासून सुरू झाली आहे. ९ जून ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख असणार असून या विधान परिषदेच्या १० जागांसाठी २० जूनला मतदान होणार आहे.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.