Chief Minister Shinde  Saam Tv Social Media
मुंबई/पुणे

Eknath Shinde: मुख्यमंत्री शिंदेंनी झणझणीत मिसळचा घेतला आस्वाद; बील देत कामगारांची दिवाळी केली गोड

Chief Minister Shinde : मुख्यमंत्री शिंदेंनी झणझणीत मिसळवर ताव मारल्यानंतर हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट दिलं.

Bharat Jadhav

Chief Minister Shinde :

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज दीपावलीच्या निमित्ताने मिसळचा आस्वाद घेतला. तलाव पालीला फेरफटका मारताना मुख्यमंत्री शिंदेंनी मिसळवर ताव मारला. झणझणीत मिसळ खाल्ल्यानंतर त्यांनी हॉटेलमधील कामगारांची दिवाळी गोड केली.

ठाण्यात माजी महापौर आणि शिंदे गटाच्या ठाणे जिल्ह्याच्या महिला संघटिका मीनाक्षी शिंदे यांनी दिवाळी पहाटचं आयोजन केलं होतं. ठाण्यातील तलाव पाली येथील दिवाळी पहाटच्या कार्यक्रमात गौतमी पाटीलचा खास शो ठेवण्यात आला होता. या दिवाळी पहाट कार्यक्रमाला मुख्यमंत्री शिंदेंनी हजेरी लावली.

कार्यक्रमाचा आनंद लुटल्यानंतर मुख्यमंत्र्यांना भूकही लागली होती. जेवणाची भूक मिटवण्यासाठी त्यांनी ठाण्यातील प्रसिद्ध मिसळचं ठिकाण गाठलं. ठाण्यात मिसळचं प्रसिद्ध ठिकाण म्हणजे मामलेदार मिसळ. या ठिकाणी मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेले आमदार प्रताप सरनाईक, आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर नरेश म्हस्के हेही होते. मिसळ खाल्ल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मिसळचे पैसे आणि तेथील कामगारांना दिवाळी भेटदेखील दिली.

मिसळवर ताव मारल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी राज्यातील जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. दीपावलीच्या सर्वांना शुभेच्छा, ही दिवाळी सर्वांना सुखी समृद्धी आनंदाची जावो म्हणत शिंदेंनी राज्यातील नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. ठाणेकरांचा जल्लोष ओसंडून वाहतोय.

गेल्यावर्षी पण जोर होता. त्यापूर्वी बंद होतं. आपलं सरकार आल्यापासून सगळी बंधनं काढली. दसरा-दिवाळी हे सगळे सण साजरं केली जात आहेत. आपले सण उत्सव ही परंपरा वाढवायला हवी. ते काम ही तरुणाई करते, धर्मवीर आनंद दिघेंचा हा बालेकिल्ला आहे. सर्वांनी उत्सव पर्यावरणपूरक साजरा करुया आणि संस्कृती कायम ठेवूया असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

मुख्यमंत्री शिंदेंनी यावेळी काही नेत्यांना राजकारण न करण्याचा सल्ला दिला आहे. राजकारणी लोकांनी सामान्यांची दिवाळी खराब करू नये, असा प्रयत्न केला पाहिजे. राजकारण करायला खूप संधी असते. दिवाळीचा सण सामान्यांच्या आयुष्यात सुखाचा, समृध्दीचा, मांगल्याचा क्षण असतो. त्या आंनदावर घालू नये, असंही शिंदे यावेळी म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Black Salt Water Benefits: पाण्यात काळे मीठ टाकून प्यायल्यास शरीरावर काय परिणाम होतो? जाणून घ्या!

Maharashtra News Live Update: मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य प्रकरणी गुन्हा दाखल

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप! एकाच झटक्यात २ कोटीहून अधिक मतदार यादीतून बाहेर; ३६ जिल्ह्यातील आकडेवारी पाहा

Ladki Bahin Yojana : ऑगस्ट महिन्याचे १५०० रुपये खात्यावर कधी जमा होणार? तारीख आली समोर

Weather Update: मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट! या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार, हवामान विभागाचा अलर्ट

SCROLL FOR NEXT