विरोधकांकडून होणाऱ्या वैयक्तिक टीकेवर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया; म्हणाले “ज्याला दाखवायचं आहे त्याला मी…” Saam Tv
मुंबई/पुणे

विरोधकांकडून होणाऱ्या वैयक्तिक टीकेवर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया; म्हणाले “ज्याला दाखवायचं आहे त्याला मी…”

राज्यावर परत एकदा कोरोनाचे संकट असून लॉकडाउन लागण्याची भीती निर्माण झाली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक

मुंबई : राज्यावर परत एकदा कोरोनाचे (Corona) संकट असून लॉकडाउन (Lockdown) लागण्याची भीती निर्माण झाली आहे. दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) प्रकृतीच्या कारणास्तव कोणत्याही कार्यक्रमांमध्ये सहभागी होत नाही आहेत. हिवाळी अधिवेशनातही (Winter session) मुख्यमंत्री अनुपस्थित असल्याने विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात आली आहे. दरम्यान विरोधकांच्या या टीकेवर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया देताना आपल्यावर होणाऱ्या टीकेला शांतपणे घेतो, ज्याला दाखवायचं आहे. त्याला त्याचवेळी मी करुन दाखवतो असे सांगितले आहे.

हे देखील पहा-

मुंबई पालिका (Mumbai Municipality) निवडणुकीच्या (election) निमित्ताने उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या नेत्यांची बैठक घेतली आहे. व्हिडीओ (Video) कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पार पडलेल्या या बैठकीमध्ये ते बोलत होते. उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील प्रतिनिधींशी संवाद साधला आहे. यावेळी शाखाप्रमुख, विभागप्रमुख, नगरसेवक, आमदार (MLA), खासदार यांच्याबरोबर बैठक पार पडली आहे. उद्धव ठाकरे यांनी यावेळी आपल्यावर होणाऱ्या टीकेसंबंधी यावेळी भाष्य केले आहे. “माझ्यावर होणाऱ्या टीकेला मी शांतपणे घेत आहे. ज्याला दाखवायचे आहे. त्याला मी त्याचवेळी करुन दाखवतो. तुम्ही निवडणुकीच्या तयारीला लागा,” अशा सूचना उद्धव ठाकरेंनी यावेळी पदाधिकाऱ्यांना दिले आहे.

उद्धव ठाकरे काय म्हणाले –

“मी मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसलो आहे. माझ्यावर वैयक्तिक टीका होत आहेत. या टीकेला मी शांतपणे घेत आहे. ज्याला दाखवायचे त्याला मी त्या वेळेला करून दाखवतो. आता येणाऱ्या निवडणुकीकरिता तयारीला लागा. मी माझ्या कामानेच माझी पोचपावती देतो,” असे उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना यावेळी सांगितले आहे.

उद्धव ठाकरेंनी यावेळी आपल्या विभागात झालेल्या कामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवा अशी देखील सूचना यावेळी दिली आहे. आपण केलेल्या विकासकामाची पोचपावती मिळायला हवी, असे ते यावेळी म्हणाले आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नितीन गिलबिले हत्ये प्रकरणी एकाला अटक

Ind Vs Sa: बुमराहचा 'पंच'! टेस्ट सामन्याच्या पहिल्याच दिवशी दक्षिण आफ्रिका 159 रन्सवर ऑलआऊट

काँग्रेसने स्वतःची वृत्ती बदलली पाहिजे – अंबादास दानवेंचा सल्ला|VIDEO

Bihar Election Result Live Updates : भाजपच्या मैथिली ठाकूर ९ हजार मतांनी आघाडीवर

Actress Passes Away: भारतीय चित्रपटसृष्टीतील तेजस्वी तारा हरपला; ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड, मनोरंजन विश्वावर शोककळा

SCROLL FOR NEXT