Eknath shinde news  saam tv
मुंबई/पुणे

'धर्मानुरागीचा इहलोकीचा... '; मुख्यमंत्र्यांनी वाहिली स्वामी स्वरूपानंद सरस्वती महाराजांना श्रद्धांजली

'जाज्वल्य अध्यात्मिक, परखड पारमार्थिक अशा धर्मानुरागीचा इहलोकीचा प्रवास थांबला, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती महाराज यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

रामनाथ दवणे, साम टीव्ही, मुंबई

shankaracharya swaroopanand saraswati Death : शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वती(shankaracharya swaroopanand saraswati) यांचे वयाच्या ९९ वर्षी निधन झाले आहे. त्यांनी रविवारी दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास मध्य प्रदेशातील नरसिंगपूर येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वती यांच्या निधनानंतर 'जाज्वल्य अध्यात्मिक, परखड पारमार्थिक अशा धर्मानुरागीचा इहलोकीचा प्रवास थांबला, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती महाराज यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले,'धर्मकार्यालाच स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी आयुष्य मानले. जाज्वल्य अध्यात्म आणि परमार्थ याबाबत ते परखड विचारांचे होते. त्यांचे उपदेश, विचार पुढील कित्येक पिढ्यांसाठी मार्गदर्शक असेच राहतील. स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन, कोटी कोटी प्रणाम. ओम शांती'

कोण होते शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वती ?

स्वामी स्वरुपानंद सरस्वती महाराज हे कोटी हिंदूंच्या श्रद्धेचे आधारस्तंभ होते. स्वामी स्वरुपानंद सरस्वती महाराजांचा जन्म २ सप्टेंबर १९२४ रोजी मध्य प्रदेशमधील सिवनी जिल्ह्यातील जबरपूरजवळील दिघोरी गावातील एका ब्राम्हण कुटुंबात झाला होता. त्यांचे नाव पोथीराम उपाध्याय असे होते.

जगद्गुरू शंकराचार्य श्री स्वामी स्वरुपानंद सरस्वती हे दोन मठांचे (द्वारका आणि ज्योतिर्मठ) शंकराचार्य होते. वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी त्यांनी घर सोडले आणि धर्मप्रवास सुरू केला. या दरम्यान ते उत्तर प्रदेशमधील काशी येथे पोहोचले आणि ब्रम्हकालीन श्री स्वामी करपात्री महाराज यांच्याकडून वेद-वेदांग तसेच धर्मशास्त्राचे शिक्षण घेतले.

स्वातंत्र्यलढ्यातही शंकराचार्यांचे मोलाचे योगदान होते. १९४२ मध्ये वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी 'क्रांतिकारी साधू' म्हणून ते नावारुपाला आले होते. स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाल्याने त्यांना इतर क्रांतिकारांप्रमाणेच काशी येथील तुरुंगात ९ महिने तर मध्य प्रदेशातील तुरुंगात ६ महिने अशी शिक्षा भोगावी लागली होती.

स्वरुपानंद सरस्वती यांनी १९५० मध्ये दंड दिक्षा घेतली होती. शंकराचार्य स्वामी ब्रह्मानंद सरस्वती यांच्याकडून त्यांनी दंड दिक्षा घेतली होती. त्यानंतर त्यांना स्वामी स्वरुपानंद सरस्वती या नावाने ओळखले जाऊ लागले तर १९८१ मध्ये त्यांना शंकराचार्य ही उपाधी मिळाली. १९८२ मध्ये ते गुजरातच्या द्वारकाशारदा पीठ आणि बद्रिनाथच्या ज्योतिर्मठाचे शंकराचार्य बनले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weekend Getaway : मुंबईकरांनो, पावसाळ्यात One Day Trip साठी हे ठिकाण आहे एकदम परफेक्ट!

Maharashtra News Live Update: मालेगावच्या गिरणा नदीत पोहायला गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू

Ambernath : "आम्ही सर्व काही मॅनेज करू" पोलिसांच्या नावाने ज्वेलर्सकडून ४ लाख रुपये खंडणी उकळली, असे अडकले पोलिसांच्या जाळ्यात

Weight loss walking tips: एका आठवड्यात 1 किलो वजन कमी करण्यासाठी रोज किती पावलं चालावं?

Child Health : तुमचं मूल वयापेक्षा मोठं दिसतंय? असू शकते 'ही' गंभीर समस्या, वेळीच करा उपाय

SCROLL FOR NEXT