eknath shinde  saam tv
मुंबई/पुणे

Ganesh Chaturthi: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं गणरायाला साकडं

संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्यदैवत असलेल्या गणरायाचं घराघरात आगमन होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - गणपती बाप्पा मोरया....मंगलमूर्ती मोरया....अशा जयघोष आज सगळीकडे ऐकायला मिळत आहे. राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम पाहायला मिळत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानीदेखील गणरायाचे आगमन झाले आहे. यावेळी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत खासदार श्रीकांत शिंदे आणि त्यांचे कुटुंबीयही उपस्थित होते. यावेळी एकनाथ शिंदेंनी राज्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, राज्यातील तमाम गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्यदैवत असलेल्या गणरायाचं घराघरात आगमन होत आहे. त्याच्या कृपेने दोन वर्षांपासून कायम असणारं कोरोनाचं संकट अखेर दूर झालं आहे. त्यामुळे आपण यंदा गणरायाचं उत्साहात, जल्लोषात आणि निर्बंधमुक्त वातावरणात स्वागत करत आहोत. गणेशाचं हे आगमन आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि समाधान घेऊन येवो, अशी प्रार्थना मी श्रींच्या चरणी करतो.”

हे देखील पाहा -

लाडक्या गणरायाचं उत्सव करताना महाराष्ट्रच्या विकासाचा पुनश्च श्री गणेश करण्याचा आपण संकल्प करूया. उत्सव साजरा करताना सामाजिक भान जपान देखील आवश्यक आहे. आरोग्य, शिक्षण, पर्यावरण या विषयांवर सार्वजनीक मंडळांनी भर देऊन जनजागृती करण्याचं आवाहन देखील एकनाथ यांनी यावेळी केलं आहे.

ठिकठिकाणी लाडक्या गणपती बाप्पाचं घरोघरी आगमन होत आहे.सार्वजनिक मंडळांपासून घराघरात आकर्षक देखाव्यात आणि मखरात गणराज आज विराजमान होतील. त्यामुळे आता पुढील दहा दिवस बाप्पाची सजावट, आरत्यांचे स्वर, गौराईचे आगमन, गणपती बाप्पा मोरया...मंगलमूर्ती मोरयाचा जयघोष ऐकायला मिळणार आहे. ठिकठिकाणी मूर्तीची प्रतिष्ठापना व सोहळ्याचे आयोजन केले जात आहे. गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाने वातावरण दुमदुमले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Dutt: भारतात पूर्वीसारखी शांतता नाही...; ट्रोल होताच संजय दत्तने दिलं स्पष्टीकरण

भाषा बदलली, गाड्या बदलल्या पण गोधडी नाही! आझाद मैदानाच्या मागे झाल्या सेटिंग, मनोज जरांगेंवर कोणी केला गंभीर आरोप?

रात्री ११ वाजता इन्स्टाग्रामवर आला एक 'व्हिडिओ कॉल' अन् मुंबईतील व्यावसायिकाच्या आयुष्यात वादळ; नक्की काय घडलं?

Maharashtra News Live Update: नंदुरबार जिल्हा परिषदेतील गैरकारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आक्रमक

Curd vs Buttermilk : दही की ताक; रोजच्या आहारात अधिक फायदेशीर काय?

SCROLL FOR NEXT