CM Eknath Shinde and Sanjay Raut  Saam TV
मुंबई/पुणे

संजय राऊतांवरील कारवाईनंतर मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया म्हणाले, तो भोंगा आता...

ज्यांनी ज्यांनी आम्हाला त्रास दिला, ते आपापल्या कर्माने जातील - मुख्यमंत्री

Jagdish Patil

मुंबई : राज्याच्या राजकारणात सर्वात मोठी घडामोड घडवणारी घटना काल घडली. ती म्हणजे पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी ईडीने शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना रविवारी ईडीने ताब्यात घेऊन रात्री उशिरा अटक केल्याची.

संजय राऊत यांना अटक केल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राऊतांची अटक म्हणजे लाज लज्जा शरम सोडून निर्लज्जपणाचे कारस्थान सुरु असल्याचं म्हटलं आहे. मात्र, या सर्व प्रकरणावरती प्रतिक्रिया देताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र राऊतांच्या अटकेवर टोला लगावला आहे.

संजय राऊत यांना ईडीकडून अटक झाल्याप्रकरणी औरंगाबाद येथे माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) खिल्ली उडवत प्रतिक्रिया दिली शिंदे म्हणाले, 'तो ८ वाजताचा भोंगा आता बंद झाला आहे. शिवाय ज्यांनी ज्यांनी आम्हाला त्रास दिला, ते आपापल्या कर्माने जातील असं देखील ते यावेळी म्हणाले.

म्हणून केली अटक -

पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी ईडीने राऊत यांना याआधी २ वेळा समन्स बजावले होते; परंतु ते चौकशीसाठी उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे ईडीचे पथक राऊतांच्या निवासस्थानी पोहोचले. दरम्यान, त्यांची ७ ते ८तास चौकशी केली. मात्र ते चौकशीत सहकार्य करत नसल्याचे सांगत ईडीकडून (ED) त्यांना दुपारी ताब्यात घेण्यात आले. त्यांना ईडीच्या कार्यालयात नेण्यात आले. दुपारपासून रात्री उशिरापर्यंत चौकशी केल्यानंतर संजय राऊत यांना अटक करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

पाहा व्हिडीओ -

राऊतांवरती ईडीने केलेल्या कारवाईवरती त्यांचे बंधू व आमदार सुनील राऊत यांनी संजय राऊत यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तर ८ वाजताचा भोंगा बंद झाला असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकानाथ शिंदे यांनी दिली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pitru Paksha : पितरांना प्रसन्न करण्यासाठी बनवा तांदळाची खीर, श्राद्धाच्या नैवेद्यासाठी अगदी सोपी रेसिपी

Heart attack - घरी एकटे असताना हार्ट अटॅक आला तर काय कराल? 'या' ३ गोष्टी वाचवू शकतात तुमचा जीव

सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला मोठा झटका, थेट नोटीस पाठवली, सुनावणीत काय घडलं?

Shraddha ritual: श्राद्धाच्या दिवशी कावळा आला नाही तर ते अन्न कोणाला द्याल? जाणून घ्या नियम

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

SCROLL FOR NEXT